Drought Agrowon
ॲग्रो विशेष

Drought : काँग्रेस करणार राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

Drought Conditions : राज्यात उद्भवलेल्या विविध भागातील दुष्काळीसदृश्य परिस्थितीची पाहणी काँग्रेस नेत्यांकडून केली जाणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याच्या विविध भागात यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून दुष्काळीसदृश्य स्थिती आहे. यावर राज्य सरकारकडून ठोस उपाय योजना झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी हवालदिल झाला आहे. यावरून काँग्रेसने कंबर कसली असून राज्यातील दुष्काळी भागाचा पाहणी केली जाणार आहे. यासाठी काँग्रेसने समित्या गठीत केल्या आहेत. 

राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारला दुष्काळाची चिंता नसून जनता दुष्काळाने होरपळ आहे. मात्र महायुती राजकीय साठमारीत व्यस्त असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तसेच राज्यातील विभागनिहाय दुष्काळग्रस्त भागाची पाहणी काँग्रेस करणार आहे. यासाठी विभागनिहाय दुष्काळ पाहणी समित्यांची स्थापन केली आहे. 

प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेवरून या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. ज्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून विभागीय आयुक्तांना व प्रदेश काँग्रेसला अहवाल देतील. 

असे असतील विभाग व विभाग समिती प्रमुख 

मराठवाडा विभागाचे समिती प्रमुख प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील. उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे नागपूर विभाग समिती प्रमुखाची जबाबदारी असेल. पश्चिम महाराष्ट्र समिती प्रमुख म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काम करणार आहेत. 

कोकण विभाग समितीचे प्रमुख म्हणून प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर अमरावती विभाग समिती प्रमुख माजी मंत्री यशोमती ठाकूर असतील. तसेच या समितीत राज्यातील प्रमुख नेते, आमदार, माजी मंत्री, पदाधिकारी यांचाही समावेश असेल.

दरम्यान राज्यात एकीकडे यंदा दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे अनेकांच्या मनात नसताही जनावरांना बाजार दाखवावा लागला आहे. तर अनेकांना उभ्या पीकावर ट्रॅक्टर आणि कुऱ्हाड चालवावी लागली आहे. तर दुसरीकडे राज्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारात आणि प्रशासन निवडणुकीच्या तयारीत गुंतले होते. आता निवडणुका पार पडल्या असून राज्यकर्ते जागे झाले आहेत. मात्र प्रशासन अद्यात मतमोजणीच्या कार्यक्रमात गुंतले आहे. यामुळे सरकारसह प्रशासनाला राज्यातील दुष्काळाची चिंता नाही असा आरोप नागरीकांसह विरोधकांनी केलाय. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT