Caste Census  Agrowon
ॲग्रो विशेष

Telangana Caste Census : तेलंगणमध्ये जातीनिहाय सर्वेक्षण करू

Rahul Gandhi News : छत्तीसगड, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये आम्ही याआधीच जातीनिहाय सर्वेक्षण सुरू केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

Team Agrowon

Latest Marathi News : तेलंगणमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर जातिनिहाय सर्वेक्षण केले जाईल. यामुळे केसीआर यांच्या कुटुंबाने तेलंगणला नेमके किती लुटले? याचा तपशील समजू शकेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (ता. १९) केले. छत्तीसगड, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये आम्ही याआधीच जातीनिहाय सर्वेक्षण सुरू केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

राहुल यांच्या ‘विजयभेरी यात्रे’ला गुरुवारी येथून प्रारंभ झाला. या निमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. राहुल म्हणाले, की पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री केसीआर हे जेव्हा भाषण द्यायला सुरुवात करतील तेव्हा त्यांना राज्यामध्ये आपण जातीनिहाय सर्वेक्षण कधी करणार? असा प्रश्न विचारायला हवा. विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल हे सध्या तीन दिवसांच्या तेलंगण दौऱ्यावर आले असून गुरुवारी त्यांनी विजयभेरी यात्रेच्या माध्यमातून थेट लोकांशी संवाद साधला.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या जातीनिहाय सर्वेक्षण हाच केवळ भारतातील संवेदनशील विषय आहे. अशाप्रकारच्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून समाजातील अनुसूचित जाती आणि जमाती तसेच मागास घटकांच्या प्रमाणावर एक्स-रे टाकला जाईल.

केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही देशभर अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले असून काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत तशा प्रकारचा ठरावदेखील मंजूर करण्यात आला आहे. आमच्याकडे सत्ता आल्यानंतर कायदा करून आरक्षणावरील पन्नास टक्क्यांची मर्यादाही हटविण्यात येईल, असे राहुल म्हणाले.

देशात पाच टक्केच ओबीसी आहेत का?

केंद्रातील भाजपच्या सरकारने उद्योजक गौतम अदानी यांचे कर्ज माफ केले असून गरीब शेतकरी आणि कामगारांचे कर्जमात्र माफ केले जात नाही. देशाचे पाच टक्के बजेट हे केवळ ओबीसींकडून निश्चित केले जात असेल तर देशामध्ये केवळ पाच टक्केच ओबीसी आहेत का? असा सवाल मी मोदी आणि केसीआर यांना विचारतो आहे.

राज्यातील केसीआर यांचे सरकार सर्वाधिक भ्रष्ट सरकार असून केवळ एकाच कुटुंबाकडून ते चालविले जाते. एका कुटुंबाच्या हातामध्ये सत्ता गेल्यामुळे नेमके काय होते? याची फळे राज्यातील जनता भोगत आहे, असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT