Sunil Kedar Agrowon
ॲग्रो विशेष

Sunil Kedar : ...अखेर सुनील केदार यांची आमदारकी रद्द; बँक घोटाळा पडला महागात

NDCCB Bank Scam Case : राज्याचे माजी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना बँक घोटाळा महागात पडला आहे. नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आता त्यांना दुसरा धक्का विधीमंडळाने दिला.

Aslam Abdul Shanedivan

Nagpur News : काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने धक्का दिला होता. न्यायालयाने निकाल देताना त्यांना दोषी ठरवत ५ वर्षांच्या कारावासह १२.५० लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. त्यानंतर आता रविवारी (२४ रोजी) त्यांची आमदारकी देखील रद्द झाली आहे. त्यामुळे केदार यांना न्यायालयानंतर विधीमंडळाने देखील दे धक्का केला आहे.

नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने केदार यांना दोषी ठरवले होते. तसेच केदार यांना ५ वर्षांच्या कारावासह १२.५० लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. त्यानंतर याप्रकरणातील निर्णयाची माहिती असणारे निकाल पत्र नागपूर पोलिसांनी विधीमंडळाकडे सादर केले होते.

नागपूर पोलिसांनी विधीमंडळाकडे सादर केलेल्या माहितीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. दरम्यान बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा झाल्याने केदार यांची आमदारकी झाली आहे.

केदार अतिदक्षता विभागात

न्यायालयाने बँक घोटाळा प्रकरणात केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर अचानक त्यांना डोकेदुखी आणि छातीत दुखने सुरू झाले. यामुळे केदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.

काय आहे प्रकरण?

साल २००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत हा घोटाळा झाला होता. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष सुनील केदार होते. त्यांच्या अध्यक्ष काळात बँकेने १५२ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या सरकारी रोखी खरेदी केल्या होत्या. त्यातच घोटाळा झाल्याने त्यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ज्याचा 22 वर्षांनंतर निकाल लागला. ज्यात न्यायालयाने केदार यांना दोषी ठरवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT