Satej Patil vs eknath shinde agrowon
ॲग्रो विशेष

Satej Patil : 'शक्तिपीठ' बाबत मुख्यमंत्री शिंदेंकडून दिशाभूल, 'आंदोलनात फूट पाडण्याचा डाव'

Shkatipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळल्याची घोषणा करून आंदोलनात फूट पाडण्याचा डाव असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली.

sandeep Shirguppe

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळल्याची घोषणा करून आंदोलनात फूट पाडण्याचा डाव असून, हा लढा सुरूच ठेवणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय बोलतात याचं त्यांनाच माहिती नसतं. विरोधकांना जोडा दाखवा म्हणणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत सहा दिवस येथे तळ ठोकूनही कोल्हापूरकरांनी मुख्यमंत्री शिंदे यांना चांगलाच जोडा दाखवल्याचं हे ते विसरले असतील असा पलटवार काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला.

सतेज पाटील पुढे म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. परंतु ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे त्यांनी आंदोलनात फूट पाडण्याचा डाव आखला असून, हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केलं

कोल्हापूरकरांना प्रेमाने, आपुलकीने व बंधुभावाने जिंकता येते. पण, मुख्यमंत्र्यांची भाषा काय आहे? लोकसभेला १०० टक्के येथील जनतेने दाखवून दिले, आगामी निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होईल. कोल्हापूरकरांचा दणका पाहून शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. हा आंदोलनात फूट पाडण्याचा डाव असून, कोल्हापूरकर लढा चालूच ठेवणार आहेत.

जनसुरक्षा कायद्याविषयी वकील परिषद लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरायचे नाही, असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा असून, जनसुरक्षा कायदा किती चुकीचा आहे? याविषयी प्रबोधन करण्यासाठी लवकरच वकील परिषदेचे आयोजन केले जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

‘शक्तिपीठ’ शंभर टक्के रद्दच झाला पाहिजे

शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळणार, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीला दिले आहे; परंतु हे आपल्याला मान्य नाही. सरकारने शंभर टक्के हा महामार्गच रद्द करावा, अशी भूमिका असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

सतेज पाटील यांच्या भेटीला के.पींचे शिष्टमंडळ

सध्या जिल्ह्यात चर्चेत असलेल्या बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या समर्थक शिष्टमंडळाने शुक्रवारी आमदार सतेज पाटील यांची काँग्रेस कमिटीत भेट घेतली. विधानसभा उमेदवारीबाबत त्यांनी चर्चा केली. पण, ही जागा महाविकास आघाडीमध्ये नेमकी कोणाला जाईल, त्याचा गुंता जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत अडचणी असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT