Rahul Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : देशाला मोदी-शहा नको आहेत, आम्ही नवी दृष्टी दिली : राहुल गांधी

Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर काँग्रेसने मंगळवारी (ता. ०४) दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांच्यासह खर्गे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशातील लोकसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील महायुती बहुमतापासून अद्याप दूर आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (ता. ०४) जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत टीका करताना, देशाला मोदी-शहा नको असून इंडिया आघाडीने देशाला नवी दृष्टी दिल्याचे म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला खासदार सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, देशाला आता मोदी-शहा नको असून हा लढा संविधान वाचवण्यासाठी होता. तो काही कोणत्या पक्षाच्या विरोधात नव्हती. जेंव्हा आमचे खाते गोठवण्यात आले, दिल्लीसह झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं गेलं तेंव्हा देशातील जनताच संविधान वाचवण्यासाठी लढेल असा विश्वास माझा होता. तो सार्थ ठरला आहे.

देशातील तपास संस्थांचा वापर मोदी सरकारने धमकावण्यासाठी केला. आमची लढाई ही निवडणूक ईडी आणि सीबीआय विरुद्ध होती. आमचा लढा संविधान वाचवण्यासाठी होता. त्यामुळे जनतेचे, इंडिया आघाडीतील भागीदार आणि कार्यकर्त्यांचे आम्ही आभार मानू इच्छितो की त्यांनी संविधान वाचवण्यासाठी आधी पाऊल उचलले. आम्ही इंडिया आघाडी म्हणून देशाला एक नवीन दृष्टी दिली.

तसेच इंडिया आघाडी सत्ता स्थापन करणार की नाही हा प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, आम्ही आमच्या इंडिया आघाडीतील मित्र पक्षांच्या नेत्यांशी आधी या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. तर उत्तर प्रदेशातील चांगल्या कामगिरीवरून राहुल गांधी यांनी हे यश प्रियंका गांधी यांच्या मेहनतीचा विजय असल्याचे म्हटलं आहे.

खर्गे म्हणाले, आम्हाला जनतेनं दिलेला निकाल मान्य असून हा विजय जनतेचा आहे. भाजपने फक्त एका व्यक्तीच्या नावावर मते मागितली, हाच त्यांचा पराभव आहे. जो स्मरणात राहील. राहुल यांच्या भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या समस्या समजून घेतल्या. काँग्रेस पक्ष आणि आघाडीने अत्यंत प्रतिकूल वातावरणात निवडणूक लढवली.

आमची मोहीम सकारात्मक होती. महागाई, बेरोजगारी आणि कामगारांच्या समस्यांना आम्ही आमचा मुद्दा बनवला. त्यामुळे लोक आमच्या लढ्यात सामील झाले. मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल पसरवलेले खोटे नाटे जनतेला पटलेले नाही हेच या निकालावरून आता स्पष्ट होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT