Nagpur Winter Session Agrowon
ॲग्रो विशेष

Assembly Winter Session : विदर्भाच्या प्रस्तावावरून कोंडी

Nagpur Adiveshan 2023 : विदर्भाच्या प्रश्नांवरील ठरावावरून विधानसभेत सत्ताधारी पक्षाने विरोधकांची कोंडी करत ठरावच आणू न दिल्याने प्रचंड गोंधळ झाला.

Team Agrowon

Nagpur News : विदर्भाच्या प्रश्नांवरील ठरावावरून विधानसभेत सत्ताधारी पक्षाने विरोधकांची कोंडी करत ठरावच आणू न दिल्याने प्रचंड गोंधळ झाला. तर विरोधक शक्तिहीन झाले असून, त्यांचे अवसान गळाल्याने त्यांना काय करावे हे भान उरले नाही, असा टोला लगावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनाच घेरण्याचा प्रयत्न केला. तर २९३ चा प्रस्ताव आणि अंतिम आठवडा प्रस्तावात आम्ही विदर्भातील प्रश्नांची चर्चा केली आहे. त्याला वेगळे उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान, विदर्भावर चर्चा करण्यासाठी आम्ही अधिवेशन कालावधी वाढवून मागत होतो. तुमच्यात समन्वय नाही, त्यामुळे आधी दोन उपमुख्यमंत्र्यांनी बसून ठरवा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जयंत पाटील यांनी लगावला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, बसून काही ठरवायचे नाही. कसे, कुठे बोलायचे ते आम्ही ठरवतो.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ज्याप्रमाणे ठरले आहे तसेच कामकाज होत आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव आल्यानंतर अधिवेशन संपते हे माहीत आहे ना? कामकाज सल्लागार समितीत तुम्हाला माहीत होते. आत एक आणि बाहेर एक बोलायचे धंदे बंद करा, असे सुनावले.

त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुंबईवरील मुद्द्यांना वर्षा गायकवाड यांनी आक्षेप घेत जोरदार टीका केली. गायकवाड बोलत असताना मध्येच राधशकृष्ण विखे पाटील यांचे निवेदन सुरू झाल्याने संतप्त झालेल्या गायकवाड यांनी सभात्याग केला.

विदर्भाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की विदर्भाचा जलद गतीने विकास करण्यासाठी या भागातील शेतकरी, युवक आणि इतर सर्व घटकासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. त्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय राज्य शासनाने घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की विरोधी पक्षांना विदर्भाचे काहीही पडलेले नाही. पक्षात नाना पटोले यांचा वडेट्टीवार यांच्यावर दबाव होता, त्यामुळे त्यांनी एकदाही विदर्भाचा ठराव आणला नाही. विदर्भासाठी महत्त्वाचा प्रकल्प असलेला वैनगंगा नळगंगाच्या सगळ्या मान्यता आामच्या काळात देण्यात आल्या होत्या. जयंत पाटील मंत्री असताना त्यांना अनेक अडचणी आल्याने पुढे काहीच झाले नाही.

विदर्भाच्या प्रश्नावर सरकारने पळ काढला : वडेट्टीवार

हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी कामकाज पत्रिकेत विदर्भाच्या प्रश्नावर चर्चेसाठी प्रस्ताव मांडलेला असताना त्या प्रश्नांवर चर्चेपासून सरकारने पळ काढल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यांनी विधानभवनात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘२९३ अंतर्गत प्रस्तावात विदर्भाचा उल्लेख आहे.

कामकाज पत्रिकेत विदर्भाच्या चर्चेसाठी प्रस्ताव मांडला होता. मात्र त्यावर एक अक्षर न बोलता महापालिका प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत राहिले. आम्ही विदर्भाचे अनेक प्रश्न मांडले. संत्रा, कापूस, धान, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाठी ८८ हजार कोटींचे कर्ज द्या, याची घोषणा आजच करा हे अपेक्षित होते. मात्र त्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एक अक्षरही बोलले नाहीत. याउलट विरोधकांनी विदर्भाचा प्रस्तावच दिला नाही अशी टीका सत्ताधाऱ्यांनी केली. यातूनच सरकार प्रश्नापासून पळ काढल्याचे समोर येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Controversy : बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना

MSP Committee : हमीभाव समितीच्या तीन वर्षांत सहा बैठका

Atal Pension Yojana : आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून?

Maharashtra ITI upgrade : राज्यातील शंभर ‘आयटीआय’चे बळकटीकरण करणार

Hybrid Calves Crisis : संकरित गाईंची नर वासरे झाली नकोशी

SCROLL FOR NEXT