Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : पुणे बाजार समितीत सह्यांच्या अधिकारांबाबत संभ्रमावस्था

Signing Authority Issue : सह्यांच्या अधिकारातून होणारे आर्थिक व्यवहार वादात सापडण्याची शक्यता पणन तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे बाजार समितीमधील सभापतींच्या सह्यांच्या अधिकाराबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असून, दहा संचालकांनी ठराव करून प्रशांत काळभोर यांना सह्यांचे अधिकार दिले आहेत. मात्र यावर सभापती दिलीप काळभोर यांनी आक्षेप घेत, जिल्हा उपनिबंधक आणि पणन संचालकांकडे तक्रार केली आहे. या संभ्रमावस्थेत सह्यांच्या अधिकारातून होणारे आर्थिक व्यवहार वादात सापडण्याची शक्यता पणन तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर या सगळ्या कचाट्यात सचिव सापडले असून, सचिवांनी केलेल्या सह्या या वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

बाजार समितीमधील सभापती दिलीप काळभोर आणि संचालक प्रशांत काळभोर यांच्यात सध्या सह्यांच्या अधिकारावरून द्वंद्व सुरू आहे. या सर्व प्रकार विभागीय सहनिबंधकांच्या कोर्टात आहे. तर, प्रशांत काळभोर यांनी १० संचालकांची मोट बांधून, अविश्‍वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला.

दरम्यान, प्रशांत काळभोर यांनी शुक्रवारी (ता.६) संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे. मात्र ही बैठक बाजार समितीत कायद्यानुसार सभापतींशी चर्चा करूनच बोलविण्यात येते, असा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून, ही बेकायदेशीर बैठक तत्काळ रद्द करावी, असे पत्र सभापती दिलीप काळभोर यांनी सचिव डॉ. राजाराम धोंडकर आणि पणन संचालक यांना दिले आहे. त्यामुळे बाजार समितीत सह्यांच्या पेचानंतर आता अधिकारांचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘माझ्याशी कोणताही विचार विनिमय न करता संचालक मंडळाची बोलाविलेली बैठक तातडीने रद्द करावी’, असे पत्र सभापतींनी दिले आहे. त्यामुळे त्यावर सचिव काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत दहा संचालकांनी ठराव करून सभापती काळभोर यांचा सात ऑगस्टला सह्यांचा अधिकार काढला आहे.

सभापतींची दोन पत्रे प्राप्त झाली आहेत. त्यांच्या सह्यांच्या अधिकाराबाबत ठरावाची बाब न्यायप्रविष्ट आहे. त्यावर काहीही भाष्य करता येणार नाही. कायद्यातील उपविधीनुसार गुंतागुंत निर्माण झाली आहे.
डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: गाळप हंगामासाठी नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांचे अर्ज

Agrowon Diwali Article: सर्वांगीण उन्नती साधणारी राजपुतांची शेतीसंस्कृती

Sindhudurg Rain: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी

Agrowon Diwali Article: शेतीसोबत आयुष्याचा ताळेबंदही फायद्यात राहिला पाहिजे...

Pond Management: राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन साताऱ्याकडे?

SCROLL FOR NEXT