Deputy CM Ajit Pawar  Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Fruit Drop Survey : संत्रा फळ गळती नुकसानीचे पंचनामे तातडीने करा

Deputy CM Ajit Pawar : वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे झालेल्या संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. १) दिले.

Team Agrowon

Amravati News : वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे झालेल्या संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. १) दिले.

वरुड तालुक्यातील नवासा पार्डी येथील ज्ञानेश्वर मोघे यांच्या शेतातील संत्रा पिकाच्या नुकसानीची पाहणी श्री. पवार यांनी केली.

या वेळी त्यांच्यासमवेत खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते उपस्थित होते. वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे संत्रा पिकाचे नुकसान होत आहे.

सततच्या पावसामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबिया बहरातील फळांची गळ होत आहे. परिणामी संत्रा उत्पादकांना नुकसान सोसावे लागत आहे.

या नुकसानीची दखल घेत तातडीने पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळावी, यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशा सूचना दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा आवक टिकून; सोयाबीन दरात सुधारणा, कापूस दरात वाढ, तर टोमॅटो दर टिकून तर कारलीली उठाव

Paus Andaj: राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; पुढील ३ दिवस थंडीचा कडाका कमीच राहणार

Student Achievement: भारत सरकारच्या वीरगाथा राष्ट्रीय पुरस्कारासाठी मंजुश्री घोरपडेची निवड

Illegal Electricity Connection: थकबाकीमुळे खंडित वीजजोडणी परस्पर जोडणाऱ्यांवर कारवाई: पडळकर

Education Loan Scheme: उच्च शिक्षणासाठी मिळणार ४० लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या काय आहे सरकारची योजना

SCROLL FOR NEXT