Book Publication Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Crisis: कृषी पदवीधरांनी शेतीकडे पाठ फिरविणे चिंतेचे : चंद्रकांत पाटील

Minister Chandrakant Patil: पदवी घेतलेली मुले-मुली शेतीकडे जात नाहीत, हा चिंतेचा विषय आहे,’ असे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

Team Agrowon

Pune News: ‘‘शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारने कृषी महाविद्यालयांत गुंतवणूक केली आहे, मात्र हा अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असल्याने त्या तयारीसाठी विद्यार्थी कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतात. येथून पदवी घेतलेली मुले-मुली शेतीकडे जात नाहीत, हा चिंतेचा विषय आहे,’ असे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘शाश्‍वत कृषी संजीवनी’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. सर अल्बर्ट हावर्ड यांच्या मूळ पुस्तकाचा अनिल व्यास यांनी मराठीत अनुवाद केला आहे. याप्रसंगी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, आणंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मदनगोपाल वार्ष्णेय, भारतीय किसान संघाच्या प्रांत उपाध्यक्ष स्नेहलता सावंत, सेवावर्धिनीचे कार्यवाह सोमदत्त पटवर्धन, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘कृषी महाविद्यालयात मुलींची वाढलेली संख्या सुखावह आहे. देशाच्या आर्थिक विकासात शेतीचा सर्वाधिक वाटा आहे. गेल्या काही वर्षांत मात्र रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीचा कस कमी होत आहे. तो वाढविण्यासाठी शास्त्रशुद्ध नैसर्गिक शेतीची गरज आहे.’’

डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘आज सगळीकडे प्लॉटिंग झालेले आणि डोंगर पोखरलेले दिसतात. त्यामुळे शेतजमिनीचा आता ‘बिगर कृषी’ (एनए) वापर करणे बंद व्हायला हवे, अन्यथा भारत हा कृषिप्रधान देश होता, असे म्हणण्याची वेळ येईल.’’ प्राचार्य डॉ. महानंद माने यांनी स्वागत केले. डॉ. सुश्मिता नांदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जनार्दन कदम यांनी आभार मानले.

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘बहुसांस्कृतिकतेने नटलेल्या देशात नियमांची अंमलबजावणी करणे अवघड आहे. देशाला एक भाषाही चालत नाही, हे दुर्दैव आहे. शेतीला मात्र एका सूत्रामध्ये आणून ठेवावे लागेल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात ऑक्टोबर हिट तापदायक

Gokul President Election: गोकुळ अध्यक्ष निवडीत कोरमचा पेच; राजकीय हालचालींना वेग, निवडून आलेले संचालक सहलीवर

Irrigation Permission Demand: धरणांत ७० टक्क्यांवर पाणीसाठा असल्यास पिकांना दोन पाणी द्या : रविकांत तुपकर

Khet Bachav Abhiyan: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘खेत बचाव अभियान’; पहिल्याच दिवशी १३ गावांत उपक्रम

Farmers Protest: चार दिवसांच्या आत पाणी सोडा अन्यथा...; कोरड्या कृष्णा नदीपात्रात राजू शेट्टींच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT