Compost Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Production : कंपोस्ट खत निर्मिती तंत्राचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

Compost Fertilizer : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व कृषी विज्ञान केंद्राने दत्तक घेतलेल्या मौजे शेलगाव घुगे (ता. वाशीम) या गावांमध्ये कृषी विभाग माध्यमातून व झायडेक्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने कंपोस्ट खत निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यातील गावागावांत स्वच्छता राखण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राद्वारे प्रशिक्षणाच्या माध्यमातून कंपोस्ट खत निर्मितीचे तंत्र शिकवले जात आहे. यादृष्टीने जनजागरण कार्यक्रम घेण्यात येत आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व कृषी विज्ञान केंद्राने दत्तक घेतलेल्या मौजे शेलगाव घुगे (ता. वाशीम) या गावांमध्ये कृषी विभाग माध्यमातून व झायडेक्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने कंपोस्ट खत निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यक्रमास सरपंच अजाबराव बाबाराव घुगे, केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.रवींद्र काळे, पंदेकृविचे शास्त्रज्ञ डॉ. बी.डी. गीते, कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. डी. एन. इंगोले, रमेश आंबेनागरे, संदीप गुट्टे व कृषी सहाय्यक श्री. राठोड उपस्थित होते.

श्री. इंगोले यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचा उद्देश सांगून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा अवलंब करून खत उत्पादनाद्वारे शेतीमधील खर्च कमी करीत निव्वळ नफा वाढवावा, असे आवाहन केले.

डॉ. काळे यांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात तयार होत असलेले गोठ्यातील शेण आणि कचरा यांचे योग्य नियोजन करून कंपोस्ट खत निर्मिती तंत्रज्ञानाद्वारे गावातील उकंड्याचे व्यवस्थापन केल्यास त्यामधून खत निर्मिती सोबतच गावातील स्वच्छता

राखण्यास मोठी मदत होऊ शकते, असे सांगितले. डॉ. गीते यांनी शेतकऱ्यांनी शेतातील कचरा न जाळता त्यापासून मोठ्या प्रमाणात खत निर्मिती करावी ज्यामुळे निसर्गाचा ऱ्हास न होता कचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होऊ शकते असे सांगितले.

अन्सार अली यांनी खत निर्मितीमधून शेतीला लागणारे उत्कृष्ट खत मिळू शकते. कंपोस्ट कल्चर वापरामुळे आपण ४० ते ५० दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात खत निर्मिती करून वेळ व पैसा वाचवू शकतो, असे सांगितले.

गोपाल सुधाकर घुगे, रमेश नानाराव घुगे, बाबाराव काशीराम घुगे, सुरेश नामदेवराव घुगे व उमेश सुभाष घुगे या काही निवडक शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देण्यात आले.ट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT