Canal Work Agrowon
ॲग्रो विशेष

Canal Work : पावसाळ्यापूर्वी कालव्याचे काम पूर्ण करा

Agriculture Irrigation : यंदाच्या पावसाळ्यात पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे पाणी डोंगरगाव येथे पोहचेल यादृष्टीने या कालव्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

Team Agrowon

Nashik News : यंदाच्या पावसाळ्यात पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे पाणी डोंगरगाव येथे पोहचेल यादृष्टीने या कालव्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

शुक्रवारी(ता.९) रोजी दिंडोरी तालुक्यातील मावडी, खडकजांब यासह विविध ठिकाणी पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे सद्यःस्थितीत सुरू असलेल्या कामांची व प्रकल्पाच्या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली.

यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगरचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, नांदूर मध्यमेश्वर विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप, पुणेगाव कालव्याच्या उपविभागीय अभियंता योगिता घुगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

भुजबळ यावेळी म्हणाले, की सद्यःस्थितीत एकूण १२ कि. मी , २८ कि. मी, ३५ कि.मी व ५२ कि. मी च्या टप्प्यांवर पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे काम सुरू आहे. यात प्रामुख्याने कालव्या दरम्यान स्ट्रक्चर आणि पुलांचे कामास गती द्यावी.

यासाठी आवश्यक त्याठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे व अधिकचे मनुष्यबळ लावून दर्जात्मक काम ३१ मे पूर्वी पूर्ण करण्यात यावे. यासाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आजपर्यंत १२ कि. मी मध्ये २ कि. मी आणि ४९ कि.मी मध्ये ४ कि. मी असे एकूण ६ किमी लेव्हल काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे ४९ किमी मध्ये ९०० मीटर काँक्रिटीकरण काम झाले आहे.

या कालव्यावर आजमितीस १२ किमी मध्ये ६ मशिन, २८ किमी मध्ये ६ मशिन तर ३५ किमी मध्ये ६ मशीन असे एकूण १८ मशीनने अतिशय गतीने काम सुरू आहे. या सुरू असलेल्या कामाची परिस्थिती पाहता निश्चितच कालव्याचे काम मे अखेर पर्यंत काँक्रीटीकरण करण्याचे काम १५ जून अखेर पूर्ण होणार, असल्याचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांनी यावेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT