Gokul Dudh Sangh Agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Dudh Sangh : काय सांगता! म्हैस २० लिटर दूध तर गायीने दिले ४० लिटर यंदाचा 'गोकुळ श्री' ठरले मानकरी

Buffaloes and Cows Milk : लिंगनूर कसबा नूलच्या विजय दळवी यांची म्हैस प्रथम आणि सरवडे येथील शांताराम साठे यांच्या गायीने प्रथम क्रमांक पटकावला.

sandeep Shirguppe

Gokul Milk : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या वतीने दूध उत्पादनवाढीसाठी व उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी गायी व म्हशींकरिता 'गोकुळ श्री' स्पर्धा घेतली जाते. यामध्ये लिंगनूर कसबा नूलच्या विजय दळवी यांची म्हैस प्रथम आणि सरवडे येथील शांताराम साठे यांच्या गायीने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण ८१ म्हैस व गाय दूध उत्पादकांनी सहभाग घेतला.

गोकुळच्यावतीने ३० नोव्हेंबर २०२३ रोजी ही स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये लक्ष्मी सहकारी दूध संस्थेचे (लिंगनूर क. नूल ता. गडहिंग्लज) म्हैस दूध उत्पादक विजय विठ्ठल दळवी यांच्या जाफराबादी जातीच्या म्हैशीने एका दिवसात सकाळ व सांयकाळ दरम्यान एकूण २० लिटर ५८० मिली लिटर दूध दिले आहे.

किसनराव मोरे दूध संस्थेचे (ता. सरवडे ता. राधानगरी) गाय दूध उत्पादक शांताराम आनंदा साठे यांच्या एच.एफ जातीच्या गायीने सकाळ व सांयकाळ दरम्यान एकूण ४० लिटर २२५ मिली दूध देऊन प्रथम क्रमांक पटकाविला. गोकुळशी सलग्न असणा-या सर्व प्रथमिक दूध संस्थांच्या सभासदांकरिता स्पर्धा प्रतिवर्षी घेतल्या जातात.

दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे, जातिवंत जनावरे खरेदी करणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्ये दूध उत्पादन वाढवणे याचबरोबर दुग्ध व्यवसायामधुन दूध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ दिला जात आहे.

सन २०२३-२४ मधील म्हैस गटातील विजेते दूध उत्पादक

१. श्री.लक्ष्मी लिंगनूर क.नूल गडहिंग्लज श्री.विजय विठ्ठल दळवी २०.५८० लिटर दूध प्रथम ३०,००० हजार

२.श्री.साई महीला गिजवणे गडहिंग्‍लज, श्री.शुभम कृष्णा मोरे, १९.५००, द्वितीय, २५,०००

३. श्री.लक्ष्‍मी गडहिंग्लज, गडहिंग्लज सौ.वंदना संजय जरळी १९.३४० तृतीय २०,०००

सन २०२३-२४ मधील गाय गटातील विजेते दूध उत्पादक

१. मा.आम.कै.किसनराव मोरे सरवडे राधानगरी श्री.शांताराम आनंदा साठे ४०.२२५ प्रथम २५,०००

२. श्री.दत्त बेलवळे बु. कागल श्री.दीपक संभाजी सावेकर ३१.११० द्वितीय २०,०००

३. श्री.शिवपार्वती वडणगे करवीर श्री.करीम महमदह,नीफ मुल्ला ३०.८२० तृतीय १५,०००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT