Land Acquisition  Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition : रेल्वेसाठी संपादित जमिनीचा मावेजा थेट खरेदीप्रमाणे द्यावा

Land Acquisition Compensation : सोलापूर - तुळजापूर - धाराशिव या नवीन रेल्वेमार्गासाठी सध्या रेल्वेकडून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाचे काम सुरू आहे.

Team Agrowon

Dharashiv News : सोलापूर - तुळजापूर- धाराशिव नवीन रेल्वेमार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा आकांक्षित जिल्हा म्हणून थेट खरेदी प्रस्तावाप्रमाणे शेतकऱ्यांना द्यावा तसेच या रेल्वे मार्गाचे भूसंपादन ऐंशी टक्के जमिनीचे संपादन झाल्यानंतरच रेल्वेमार्गाच्या कामाची निविदा काढावी, अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गुरुवारी (ता. ३१) लोकसभेत केली.

ऐंशी टक्के जमिनीचे संपादन होण्यापूर्वीच रेल्वेमार्गाच्या कामाच्या निविदा काढण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही निंबाळकर यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले. सोलापूर - तुळजापूर - धाराशिव या नवीन रेल्वेमार्गासाठी सध्या रेल्वेकडून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाचे काम सुरू आहे. हे काम अजून ऐंशी टक्केही झाले नाही. तरीही रेल्वेमार्गाच्या कामाची निविदा काढण्यात येत आहे.

या स्थितीत ऐंशी टक्के भूसंपादन झाल्यानंतर निविदा काढावी तसेच रेल्वेमार्गासाठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीचा मावेजा थेट खरेदी प्रस्तावाप्रमाणे शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी निंबाळकर यांनी केली. आकांक्षित जिल्हा असल्यामुळे रेल्वेने थेट खरेदी प्रस्तावाप्रमाणे शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबत कोरोना काळात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पत्रकारांच्या रेल्वेच्या सवलती बंद करण्यात आल्या.

त्या पुर्ववत सुरु कराव्यात, लातूर- मुंबई व बिदर- मुंबई रेल्वे गाडयांमध्ये मोठया प्रमाणात प्रवाशी प्रवास करत आहेत. जनरलचे डबे ओव्हर क्राऊड असतात. यामुळे धाराशिव व बार्शी स्थानकावरून जनरल बोगीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जागा मिळत नाही.

दोन्ही गाड्यांना जनरल बोगीची संख्या वाढवण्यात यावी, लातूर- मुंबई या गाडीला कळंब रोड (तडवळा) तर नांदेड - पनवेल या गाडीला ढोकी येथे थांबा द्यावा, रेल्वेकडून शेतकऱ्यांच्या जमिनीवर विविध विकास कामासाठी अतिक्रमण केले जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असून रेल्वेने संपादित जमिनीमध्ये सीमा निश्चिती करून घ्यावी, शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करू नये किंवा जमीन रेल्वे विभागाच्या मालकीची असल्याचे सबळ पुरावे द्यावेत, पुरावे नसल्यास शेतकऱ्यांना अतिक्रमित जमिनीचा मावेजा द्यावा, अशी मागणी निंबाळकर यांनी केली.

वहिवाटीचे रस्ते बंद करून यूबी अन् ओबी

रेल्वेकडून मार्गाखालून पर्यायी रस्त्यांचे बांधकाम करत असताना शेतकऱ्यांच्या वहिवाटीतील रस्ते बंद करून रेल्वे मार्गावर अंडर ब्रीज (यूबी) व ओव्हर ब्रीज (ओबी) अशा रस्त्यांची निर्मिती केली जाते. मात्र, हे रस्ते दर्जाहीन असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचेही निंबाळकर यांनी निदर्शनास आणून याकडे लक्ष देण्याची मागणी केली.

धाराशिव स्थानकावरील रॅक पॉइन्ट येथे निवारा शेड नसल्याने रेल्वेने आलेली खते व अन्नधान्याची पावसाळ्यात मोठया प्रमाणात नासाडी होते. रॅक पॉइन्ट येथे निवारा उभा करण्याकडेही त्यांनी रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले. लातूरच्या रेल्वे कोच फॅक्टरीचे दोन वेळा उद्घाटन करण्यात आले. अनेक वर्षाचा कालावधी जाऊनही रेल्वे कोच फॅक्टरीमधून अद्याप उत्पादन सुरु नसल्याचे सांगून निंबाळकर यांनी सरकारला धारेवर धरले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT