Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Team Agrowon

Latur News : आचारसंहितेच्या तोंडावर वेगवान प्रशासनाचा प्रत्यय शेतकऱ्यांना देत राज्य सरकारने शुक्रवारी (ता. ४) सात जिल्ह्यांत ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची ९९७ कोटी भरपाई मंजूर केली आहे. यात मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसाठी ९८७ कोटी मंजूर केले आहेत.

बीडला ऑगस्टमधील अतिवृष्टीसाठी ५४ कोटी, परभणीला सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी ५४८ कोटी मंजूर झाले आहेत. भरपाई मिळवण्यात लातूर जिल्हा आघाडीवर असून जिल्ह्याला ऑगस्टमधील अतिवृष्टीसाठी दोन कोटी तर सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी ३८४ कोटी मंजूर झाले आहेत. धाराशिव जिल्हा प्रशासनाची भरपाईसाठी अजून आकडेमोड सुरु आहे.

संबंधित जिल्ह्यांनी भरपाईचे प्रस्ताव मागील चार दिवसात सरकारला दिले होते. सरकारने त्यावर वेगाने निर्णय घेत भरपाई मंजूर केली आहे. आचारसंहितेच्या कचाट्यात निर्णय सापडण्यापू्र्वी सरकारने केलेल्या वेगवान हालचालीचा फायदा सात जिल्ह्यातील नऊ लाख ७५ हजार ५९ बाधित शेतकऱ्यांना झाला आहे. लातूर जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसान भरपाईपोटी दोन कोटी एक लाख आठ हजार रुपये मंजूर झाले आहेत.

सरकारने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ऑगस्टमधील अतिवृष्टीसाठी एक कोटी चार लाख तर चंद्रपूर जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी नऊ कोटी ३२ लाख मंजूर केले आहेत. ऑगस्टमधील अतिवृष्टीसाठी बीडच्या ७९ हजार ४९२ शेतकऱ्यांना ५४ कोटी ६२ लाख, लातूर जिल्ह्यातील ३२६ शेतकऱ्यांना दोन कोटी एक लाख तर सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी परभणी जिल्ह्यातील पाच लाख २९ हजार ७६२ शेतकऱ्यांना ५४८ कोटी ८५ लाख रुपये व लातूर जिल्ह्यातील तीन लाख ५८ हजार ७६७ शेतकऱ्यांना ३८४ कोटी १४ लाखाची भरपाई देण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी सादर केल्यानंतर सरकारने त्यास चार दिवसातच मंजूरी दिली आहे. लवकरच ही भरपाई बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

दोन लाख ८२ हेक्टरला बाधा

लातूर जिल्ह्यात दोन लाख ८२ हजार ४५८ हेक्टवरील पिकांचे सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे नुकसान झाले. यात दोन लाख ६८ हजार नऊशे हेक्टवरील सोयाबीन, दहा हजार ३०३ हेक्टवरील कापूस तर दोन हजार ६२६ हेक्टरवरील तुरीचे नुकसान झाले. यात दोनपेक्षा अधिक म्हणजे तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसान भरपाईसाठी मोठ्या संख्येने शेतकरी पात्र ठरले आहेत. धाराशिव जिल्ह्यात अद्याप नुकसानीचे पंचनामे सुरू असून शिवारात पाणी साचल्यामुळे पंचनाम्याला अडचणी येत असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. धाराशिवचाही भरपाईचा प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

Water Scheme : किकवी पेयजल प्रकल्पाला मंजुरी

SCROLL FOR NEXT