Hirda Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Hirda Crop Damage : हिरडा झाड, फळ नुकसान भरपाईच्या कक्षेत आणावे

Crop Damage Compensation : हिरड्याचे झाड व फळ नुकसानभरपाईच्या कक्षेत आणावे यासाठी आंबेगाव तालुका कृषी कार्यालय यांनी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सदरील प्रस्ताव जिल्हा कृषी अधीक्षक यांना तयार करून पाठवलेला आहे.

Team Agrowon

Pune News : हिरड्याचे झाड व फळ नुकसानभरपाईच्या कक्षेत आणावे यासाठी आंबेगाव तालुका कृषी कार्यालय यांनी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सदरील प्रस्ताव जिल्हा कृषी अधीक्षक यांना तयार करून पाठवलेला आहे.

या प्रस्तावावर जिल्हा कृषी अधीक्षक यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन किसान सभेने नुकतेच जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयास सादर केलेले आहे, अशी माहिती किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे यांनी दिली.

हिरड्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत, तालुका कृषी अधिकारी यांनी हिरड्याला नुकसान भरपाई कक्षेत घेण्यात आणावे यासाठी वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठवावा असे ठरले होते. त्यानुसार हे प्रस्ताव देण्यात आला होता.

यामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांचे मुख्य उत्पन्नाचे साधन असलेले व नगद रक्कम प्राप्त करून देणारे बाळहिरडा हेच एकमेव साधन आहे. राज्यात जून २०२० च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या, निसर्ग चक्रीवादळामुळे शेतीपिकांचे, फळबागांचे तसेच घरे व इतर घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झालेले होते.

या वेळी आदिवासी समाजाचे मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या बाळहिरडा या औषधी फळाचे ही, या वेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून गेली चार वर्षे किसान सभेच्या नेतृत्वाखाली लढा उभा राहिला होता.

याचेच यश म्हणजे राज्य शासनाने अखेर ही नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा केली. ही नुकसान भरपाई विशेष बाब म्हणून देण्यात आलेली आहे. त्यामुळे हिरडा फळ व त्याचे झाड हे नुकसान भरपाईच्या कक्षेत शासनाने आणावे, यासाठी किसान सभेने आंदोलनाचे पत्र दिलेले होते. या वेळी किसान सभेच्या वतीने राजू घोडे, अशोक पेकारी, लक्ष्मण जोशी, आमोद गरुड, दत्ता गिरंगे, कृष्णा वडेकर, रामदास लोहकरे, सुभाष भोकटे, कमल बांबळे, अशोक जोशी आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

E-Pashu App : पशुसंवर्धन विभागाकडून पशू अ‍ॅपचा प्रभावी वापर

Humani Attack : बुलडाणा जिल्ह्यात हुमणीचा वाढता प्रादुर्भाव

Rain Crop Loss : रिसोड, मंगरूळपीर तालुक्यांत अतिवृष्टीचा कहर

SCROLL FOR NEXT