Crop Compensation Amount Agrowon
ॲग्रो विशेष

Fake Beneficiaries : बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम

Team Agrowon

Nagpur News : नागपूर जिल्ह्यात कुही तालुक्यातील अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने पैसे लाटल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केला होता.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नायब तहसीलदार यांच्या नेतृत्त्वात पाच सदस्यीय समिती गठित केली. यातील आरोपात काही प्रमाणात तथ्य असल्याचा प्राथमिक अंदाज चौकशीचा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

सरकारने २०२२-२३ या वर्षामध्ये शेत पिकांच्या नुकसानभरपाईसाठी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टरी मदत घोषित केली. मात्र कुही तालुक्यात महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बोगस लाभार्थ्यांची नावे सरकारला सादर केली आणि अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे लाटले. यासाठी मूळ शेतकऱ्यांच्या खसरा क्रमांकाचा वापर करण्यात आला.

१४ हजार शेतकऱ्यांची रक्कम वळता करण्यात आली. ही रक्कम ३४ कोटींच्या घरात असल्याचा मुद्दा दानवे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी तडकाफडकी पाच सदस्यीय चौकशी समिती गठित केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चौकशी समितीला आरोपामध्ये काही अंशी तत्थ्य आढळून आले आहे. बोगस लाभार्थ्यांचा आकडा १४ हजारांच्या घरात नसला तरी काही बोगस खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम वळती झाली आहे. समितीकडून चौकशी अद्याप पूर्ण व्हायची असल्याचे सूत्रांकडून समजते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT