Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस गाळपाची गती कमीच

Sugarcane Update : देशातील गळीत हंगाम आता हळूहळू वेग घेत आहे. नोव्हेंबरअखेर देशातील ३८१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : देशातील गळीत हंगाम आता हळूहळू वेग घेत आहे. नोव्हेंबरअखेर देशातील ३८१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांनी ३३२ लाख टन उसाचे गाळप करीत २८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

या कालावधीतही साखर उत्पादनात उत्तर प्रदेशने आघाडी घेत १२ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले. त्या खालोखाल कर्नाटकने ७ लाख टन, तर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी केवळ ४.६० लाख टन साखरेची निर्मिती केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही हंगामाची गती फारशी वाढली नाही.

गेल्या हंगामात या कालावधीत ४३ लाख टन साखर देशात तयार झाली होती. गेल्या वर्षी या कालावधीत ४३३ साखर कारखान्यांनी ५१२.१७ लाख टन उसाचे गाळप केले होते. अजूनही महाराष्ट्रातील हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला नसल्याने इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची साखर उत्‍पादनाची गती कमी आहे.

देशाचा साखर उताऱ्यात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसा फरक नाही. यंदा या कालावधीत ८.३९ टक्के साखर उतारा आहे. गेल्या वर्षी तो ८.४३ टक्के इतका होता. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने ही माहिती दिली आहे. यंदा महाराष्ट्रात केवळ १२४ साखर कारखाने सुरू झाले आहेत. निवडणुकीनंतर हंगामास प्रारंभ झाला.

यामुळे यंदाच्या हंगामात राज्‍यातील साखर उत्पादन इतर राज्यांच्या तुलनेत पिछाडीवर आहेत. देशाचा हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात फक्त उत्तर प्रदेशातील कारखानेच सुरू झाल्याने साखर उत्‍पादनात आतापर्यंत उत्तर प्रदेशचेच वर्चस्व राहिले आहे.

नोव्हेंबरअखेर महाराष्ट्राच्या तिप्पट साखर उत्पादन उत्तर प्रदेशचे झाले आहेत. प्रत्येक वर्षी तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कर्नाटकने यंदा पहिल्या महिन्यात तरी उत्पादनात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. निवडणुकांचा फटका यंदा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना बसला आहे. याचे परिणाम साखर उत्पादनावर दिसून येत आहेत.

राज्याची गाळप स्‍थिती...

राज्‍यात नोव्हेंबर अखेर ६२ सहकारी, तर ६२ खासगी अशा १२४ साखर कारखान्यांनी हंगामास प्रारंभ केला आहे. कोल्‍हापूर व पुणे विभागांत प्रत्‍येकी १ लाख टन साखर तयार झाली. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा सर्वाधिक ८.४४ टक्के इतका आहे. त्या खालोखाल पुणे विभागाचा साखर उतारा ७.७ टक्के इतका आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक २८, तर पुणे विभागात १८ कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. नागपूर विभागात अजूनही एकही कारखाना सुरू झालेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT