Tamarind Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Tamarind Rate : गतवर्षीच्या तुलनेत चिंचेच्या दरात दोन हजार रुपयांनी सुधारणा

Tamarind Market : कमी पावसाने उत्पादन घटण्याची शक्यता; दरवाढीने शेतकऱ्यांना दिसाला

Team Agrowon

अभिजित डाके
Chinch Production : यंदाच्या हंगामात कमी पावसाचा फटका चिंचेलाही बसला असून उत्पादनात अंदाजे २० टक्के घट होण्याची शक्यता आहे. तासगाव बाजार समिती चिंचेच्या सौद्यांसाठी प्रसिद्ध आहे. चिंचेचा हंगाम सुरू झाला आहे.

प्रत्येक सौद्याला २५ ते ३० क्विंटल आवक होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच चिंचेच्या दरात प्रतिक्विंटल दोन ते अडीच हजार रुपयांनी सुधरणा झाल्याने शेतकऱ्यांना दिसाला मिळाला आहे. चिंचेचे दर टिकून राहण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

तासगाव ही चिंचेची पश्‍चिम महाराष्ट्रातील एकमेव बाजारपेठ आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून चिंच तासगाव बाजार समितीत विक्रीसाठी येते. दरवर्षी जानेवारी ते एप्रिल असे चार महिने चिंचेचे सौदे सुरू असतात.

तासगाव बाजार समिती आवारात चिंचेचे खुले सौदे होतात. यंदा अपुरा पाऊस झाल्याने चिंचेच्या झाडाला चिंच लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे उत्पादनात २० टक्क्यांनी घट होईल, असा प्राथमिक अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

यंदा तासगाव बाजार समितीत चिंचेचे सौदे सुरू झाले आहेत. मुळात पीक कमी असल्याने आवकही कमी आहे. त्यामुळे प्रत्येक सौद्याला अंदाजे २५ ते ३० क्विंटल चिंचेची आवक होत आहे. गतवर्षी चिंचेला सरासरी ६००० रुपये प्रतिक्विंटल दर होता.

यंदा चिंचेची आवक कमी असल्याने दरात सुधारणा झाली आहे. सध्या चिंचेला सरासरी ८३०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. बाजार समितीत फोडलेली चिंच विक्रीसाठी येते.
चिंच फोडण्यासाठी मजुरीत ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

त्यामुळे चिंच फोडण्यासाठी मजुरांची टंचाई भासू लागली असल्याने फोडलेली चिंचेची आवक कमी आहे. त्यातच अनघड म्हणजे टरफल असलेली चिंचेची आवक या बाजारात होते. अनघड चिंचेला प्रतिक्विंटल २१०० ते २२०० रुपये असा दर मिळत आहे.

निपाणी, बेळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांतील चिंचेचे व्यापारी चिंच विक्री आणि खरेदीसाठी तासगाव येथे येतात. तासगाव बाजारपेठेतून फोडलेल्या चिंचेप्रमाणे न फोडलेली चिंच, चिंचोकेही भारतातील अन्य राज्यांत पाठविले जातात.

सध्या बाजारात चिंचेची आवक कमी असली तरी चिंचेला मागणी असून उठाव होत आहे. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभापासूनच चिंचेला दर चांगले मिळत आहेत. चिंचेचा हंगाम मेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे येत्या पुढील पंधरा दिवसांपासून चिंचेच्या आवकेत वाढ होईल. चिंचेला मागणी असल्याने दरही सुधारतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

तासगाव बाजार समितीत चिंचेची आवक आणि दर
वर्ष....आवक (क्विंटलमध्ये)...दर किमान...कमाल...सरासरी (रुपयांत)
२०२१-२२...८९२...३५००...६०००...५५००
२०२२..२३...१०३७...४१००...७०००...६०००

यंदा पीक कमी आहे. त्यामुळे आवकही कमी असल्याने यंदाच्या चिंच हंगामात गतवर्षीच्या तुलनेत दरात वाढ झाली आहे. अनघड चिंचेलाही चांगली मागणी आहे. चिंचेचे दर टिकून राहतील.
- कुमार शेटे, चिंच व्यापारी, तासगाव, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Voter Fraud: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात मते वाढवली, निवडणूक आयोग मत चोरांसाठी काम करते; राहुल गांधी

Vegetable Farming Success : प्रशिक्षणातून भाजीपाला शेतीत तयार केला वार्षिक रोजगार

Flower Farming Success : अभ्यासपूर्ण गुलाबशेतीतून आर्थिक स्थैर्य, समाधानही

Nutrient Management: चुनखडीयुक्त जमिनीमध्ये ऊस पिकासाठी पोषक अन्नद्रव्य व्यवस्थापन

Sharad Pawar | अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, शेतकरी संकटात, सरकारने लक्ष द्यावे- शरद पवार

SCROLL FOR NEXT