Milk Adulteration Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Adulteration Committee: दूध भेसळ रोखण्यासाठी समिती स्थापन

Prevention Committee: पुणे जिल्ह्यातील दूध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी शासन निर्णयानुसार अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: पुणे जिल्ह्यातील दूध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी शासन निर्णयानुसार अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये अपर पोलिस अधीक्षक, पुणे, सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पुणे, उपनियंत्रक वैध मापनशास्त्र पुणे हे सदस्य तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे सदस्य सचिव असतील. दुधात भेसळ करणाऱ्या व्यक्ती, डेअरी याची माहिती समितीकडे देण्यात यावी, असे आवाहन समितीने प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

दूध आपल्या दैनंदिन आहाराचा एक आवश्यक भाग असल्याने महत्त्वपूर्ण पोषक तत्त्वांचा स्रोत असून चांगले आरोग्य राखण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तथापि हानिकारक पदार्थांसह दुधात भेसळ केल्याने ग्राहकांच्या हिताला मोठा धोका निर्माण होतो. दूध भेसळीच्या सामान्य प्रकारामध्ये पाणी, क्रीम मिल्क पावडर, वनस्पती तेल, स्टार्च, युरिया, डिटर्जंटस आणि इतर रसायनांचा समावेश करतात. हे भेसळ करणारे केवळ दुधाच्या पौष्टिक मूल्यांशी तडजोड करीत नाहीत.

तर मानवी शारीरिक समस्या, पचन, अॅर्लजी आणि दीर्घकालीन अवयवांचे नुकसान या सारख्या गंभीर आरोग्य समस्या देखील होऊ शकतात. या समस्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ग्राहक, सरकारी संस्था, दुग्ध उद्योगाचे भागधारक आणि नियामक संस्था यांनी एकत्रपणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे.

जिल्ह्यातील दूध संकलन स्वीकृती केंद्र, पुणे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील तसेच परराज्यांतून येणाऱ्या दुधाचे नमुने तसेच सहकारी व खासगी क्षेत्रातील दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावरील (डेअरी) नमुने यांची तपासणीसाठी सहायक आयुक्त (अन), अन्न औषध प्रशासन विभाग, पुणे विभागाकडील अन्न सुरक्षा यांना दरमहा उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणाऱ्या व्यक्ती, डेअरी विरोधात प्रथम खबरी अहवाल नोंदवून भेसळ केल्याचे आढळून आलेल्या कसूरदारांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

दूध भेसळीची येथे द्या माहिती

दूध भेसळीबाबत माहिती देण्यासाठी १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक व इमेल fdapune२०१९@gmail.com वर तक्रार नोंदवावी. दूध भेसळीबाबत तक्रार, माहिती देणाऱ्या व्यक्तींची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही समितीने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

SCROLL FOR NEXT