Minister Piyush Goyal  Agrowon
ॲग्रो विशेष

India Export Potential : अन्न, कृषी आणि सागरी उत्पादन निर्यात १०० अब्जपर्यंत पोहचण्याची क्षमता; वाणिज्य मंत्र्यांनी केला विश्वास व्यक्त

Trade Growth : इंडसफूड हा ट्रेड प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाने २०१७ मध्ये सुरू केला आहे. त्यासाठी केंद्रीय वाणिज्य विभाग सहकार्य करते. यामध्ये निर्यात केंद्रीत व्यापार मेळावा अशी संकल्पना ठेवून चर्चा करण्यात येते.

Dhananjay Sanap

Agriculture Exports : पुढील पाच वर्षात अन्न, कृषी आणि सागरी उत्पादनाची निर्यात १०० अब्जपर्यंत पोहचण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी (ता.१०) नवी दिल्लीतिल इंडसफूडच्या कार्यक्रमात केलं. यावेळी त्यांनी देशातील अन्न चाचणी प्रयोगासोबतच शाश्वत शेती प्रक्रियेवर मत व्यक्त केलं.

गोयल म्हणाले, "देशातील अन्न उद्योगासोबत सरकार शेती प्रक्रिया शाश्वत करण्यासाठी प्राधान्य देत आहे. तसेच सेंद्रिय शेती आणि अन्न उत्पादनांसाठी प्रोत्साहन देत आहे. देशातील सेंद्रिय शेतीमध्ये प्रचंड वाढीची क्षमता आहे. सरकारने सेंद्रिय खाद्यपदार्थांसाठी प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ केली आहे." असंही गोयल म्हणाले.

इंडसफूड हा ट्रेड प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाने २०१७ मध्ये सुरू केला आहे. त्यासाठी केंद्रीय वाणिज्य विभाग सहकार्य करते. यामध्ये निर्यात केंद्रीत व्यापार मेळावा अशी संकल्पना ठेवून चर्चा करण्यात येते. तसेच उत्पादन, आंतरराष्ट्रीय आयातदार, वितरक, किरकोळ विक्रेते यांना एकत्र आणलं जातं.

गोयल यांनी यावेळी भारतीय बाजारी लोणचे आणि मसल्याचे जगभरात आकर्षण असल्याचे सांगितले. त्यासाठी प्री-पॅकेज केलेले खाद्यपदार्थांना मागणी असून जगाभरातील नवीन भागीदार प्रयत्न करत असल्याचं गोयल यांनी सांगितले. देशातील अन्न आणि पेय क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच १०० टक्के विदेशी गुंतवणूक, परदेशी मालकी, परदेशी व्यवसाय यासाठीही परवानगी आहे. भारतात काम करणाऱ्या गुंतवणुकदारांना सहज वर्क परमीट दिलं जातं, असंही गोयल यांनी सांगितलं.

दरम्यान, इंडसफूड २०२५ च्या ८ वर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी अपेडा, मपेडा यांनी पुढाकार घेतला. तसेच मागील वर्षभरात या दोन संस्थांच्या माध्यमातून ५० अब्ज डॉलर वस्तूंची निर्यात करण्यात आल्याचं गोयल म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

Agriculture Mechanization : टिलरने वाढले शेतकऱ्यांचे बळ

Agrowon Podcast: तुरीचा बाजार मंदीतच; हळदीला मर्यादीत उठाव, कांदा स्थिर, गवार तेजीत, तर कोबीची आवक कायम!

SCROLL FOR NEXT