Eknath Shinde  Agrowon
ॲग्रो विशेष

Eknath Shinde : मातीचा गंध, सुगंध शेतीकडे खेचून आणतो

Eknath shinde Farming : मुख्यमंत्री शिंदे महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे यात्रेनिमित्त आले आहेत. या वेळी ते बुधवारी बराच वेळ आपल्या शेतात रमले.

Team Agrowon

Satara News : ‘‘मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे, जन्मभूमीकडे खेचून आणतो. माझ्या जन्मभूमीत येतो तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात,’’ अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. २५) व्यक्त केली.

मुख्यमंत्री शिंदे महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे यात्रेनिमित्त आले आहेत. या वेळी ते बुधवारी बराच वेळ आपल्या शेतात रमले. औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा, सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला पिकांची या ठिकाणी लागवड करण्यात आली आहे.

श्री. शिंदे म्हणाले, ‘‘शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात. गाव , शेती, गावाकडची माणसांचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते. माणूस गावापासून कितीही दूर गेला, कितीही मोठा झाला तरी त्याला आपल्या मातीबद्दल, गावाबद्दल प्रेम असते.’’

‘उत्पन्न वाढविणारी पिके घ्या’

‘‘आर्थिक उत्पन्न वाढविणाऱ्या पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे. सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहीम राबविण्यात येत आहे. जवळपास दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट आहे. बांबूला मोठी मागणी आहे.

तसेच रेशीम, सुपारी लागवड अशा उत्पादनांचे क्लस्टर शेतकऱ्यांनी करावे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती नक्की होईल. कादांटी खोऱ्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी येथे रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत,’’ असेही शिंदे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief : दुष्काळ निवारणात कसूर केल्यास कारवाई

Mula Canal Breach : चांद्याजवळ मुळा उजव्या कालव्याचा भराव खचला

Fodder Management : पिण्याचे पाणी, चाऱ्याचे तातडीने नियोजन करा

Land Acquisition: भूमी अधिग्रहण कायदा रद्द करा : लक्ष्मीकांत कौठकर

Soil Moisture: दुष्काळाच्या परिस्थितीत मातीतील ओलावा कसा टिकवावा?

SCROLL FOR NEXT