Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Impact : ढगाळ हवामानामुळे पिकांच्या वाढीला ‘ब्रेक’

Cloudy Weather Issue : गेल्या काही दिवसांपासून निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Team Agrowon

Pune News : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, उरळगाव, दहिवडी, पारोडी, नागरगाव आदी गावांत गेल्या काही दिवसांपासून निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम गृहीत धरलेले उत्पादन होईल की नाही याची चिंता बळीराजा व्यक्त करीत आहे.

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगाम जोमात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. बऱ्याच ठिकाणी कांदा, गव्हाची खुरपणी झाली आहे. तर काही ठिकाणी सुरू आहे.

अचानक कडाक्याची थंडी असते तर कधी थंडी गायब होत आहे. हवामानाच्या लहरीपणामुळे कांदा, गहू तसेच भाजीपाला, फळ पिके, हरभरा आदी पिकांवर कीड,रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली आहे. कीड, रोगांच्या नियंत्रणासाठी अतिरिक्त फवारण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे खर्चात वाढ होणार आहे, असे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उत्पादन खर्चात वाढ होणार झाल्याने खर्च भरून निघण्याची विवंचना असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना खर्च भरून निघण्याची विवंचना

बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी फवारण्याच्या संख्येत वाढ.

उत्पादन खर्चात वाढ झाल्याने खर्च भरून निघण्याची विवंचना.

पिकावर मावा कीड तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव.

कांदा, गहू, हरभरा तसेच भाजीपाला पिकावर मावा कीड, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. जर हवामान असेच राहिले, तर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढेल की काय अशी शक्यता आहे. नियंत्रणासाठी फवारण्या कराव्या लागणार असल्याने उत्पादन खर्चात वाढ होत आहे. कीड,रोग नियंत्रणाबाबत सल्यासाठी कृषी तज्ज्ञांशी संपर्क साधला आहे. त्यानुसार फवारणीचे नियोजन करत आहे.
राहुल करपे-पाटील, टाकळी भीमा (ता. शिरूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT