Water Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Water Supply : बंदिस्त पाइपलाइनची चाचणी सुरू

गतवर्षी एप्रिल महिन्यात मानकरवाडी ते रेड या १२ किलोमीटरच्या बंदिस्त पाइपलाइनच्या चाचणीचे काम झाले आहे.

Team Agrowon

Sangli Water Supply News : शिराळा व वाळवा तालुक्याच्या बहुचर्चित असणाऱ्या वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या रेड ते ढगेवाडी व रेड ते मरळनाथपूर आणि सुरूल येथील बंदिस्त पाइपलाइनच्या (pipeline) पाण्याच्या चाचणीचे काम सुरू झाले आहे.

गतवर्षी एप्रिल महिन्यात मानकरवाडी ते रेड या १२ किलोमीटरच्या बंदिस्त पाइपलाइनच्या चाचणीचे काम झाले आहे.

त्यानंतर त्या पाण्याचे पूजन तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते झाले. ते पाणी रेठरे धरणात येत असल्याने त्या परिसरातील शेतीला त्याचा फायदा होत आहे.

गतवर्षी मानकरवाडी ते रेड या १२ किलोमीटर बंदिस्त पाइपलाइनची चाचणी यशस्वी झाली आहे. आता रेड ते ढगेवाडी या सात किलोमीटर व रेड ते मरळनाथपूर या १२ किलोमीटर आणि सुरूल या पाच किलोमीटरच्या बंदिस्त पाइपलाइनची चाचणी घेण्याचे काम सुरू आहे.

यासाठी वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, सहायक अभियंता दीपक परळे, उपअभियंता अमोल कमलाकर, उपअभियंता पी. बी. बंडगर, व्ही. एम. पाटील आदी प्रयत्नशील आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Land: सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीला धक्का नाही! पण 'त्या' पडीक शेतजमिनी ३ वर्षांत पिकाखाली आणा- बावनकुळे

Water Projects Completion Target: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना वेग ३० जून २०२७ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; मृद व जलसंधारण आणि कृषी विभाग एकत्रित काम करणार

Sweet Corn Farming: कमी पाण्यात, कालावधीत उत्पन्नांसाठी मधुमका फायद्याचा

Small Hive Beetle: मधमाश्यांच्या पोळ्यातील नवा शत्रू ‘स्मॉल हाईव्ह बीटल’

Women Empowerment: संजित ‘बंकर’ रॉय : कृतिशील महिला शिक्षणाचा कर्ता

SCROLL FOR NEXT