Solapur ZP Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur ZP : सोलापूर जिल्हा परिषदेत मार्च एन्डची लगबग

March End Update: जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी आज आरोग्य विभागाचा समक्ष आढावा घेतला.

Team Agrowon

Solapur ZP News : मार्च अखेर निधी खर्च करण्याची धावपळ असताना कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जिल्हा परिषदेचा गाडा ठप्प झाला होता.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेतल्यानंतर जिल्हा परिषेदत मार्च अखेरला अवघे काही दिवस उरल्याने आता जिल्हा परिषदेची यंत्रणा मार्च अखेर सर्व निधी खर्च करण्यासाठी मिशन मोडवर काम करताना दिसत आहे.

येथे मार्च एण्डची जणू लगीनघाई उठली असून अधिकारी व कर्मचारी मार्च एण्डच्या कामात व्यस्त राहात आहेत.

जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी आज आरोग्य विभागाचा समक्ष आढावा घेतला.

त्यानंतर महाआवास योजनेच्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. व्हीसीद्वारे त्यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेतील खाते प्रमुख यांचा आढावा घेतला.

जिल्हा परिषदेला मिळालेला निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करावा अशा सक्त सूचना त्यांनी विभाग प्रमुखांना व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जवळपास सात दिवसांचा संप करून आज कर्मचारी कामावर हजर झाल्याने जिल्हा परिषदेतील शुकशुकाट संपला होता.

जिल्हा परिषदेतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांची, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांची वर्दळ बघायला मिळाली.

मार्च अखेरपर्यंत गावांमधील विकास कामांना प्रशासकीय मान्यता, देयके मंजूर करणे यासह विविध कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

Wildlife Crop Damage : पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शासन सकारात्मक

MahaDBT : ‘महाडीबीटी’ पोर्टलवर कागदपत्रे अपलोडसह अनेक अडचणी

Book Review: ध्यासपंथी वाटचालींचा कोलाज

Rural Development: शेतकरी, ग्रामीण विकास आणि पर्यावरणाचा एकत्र विचार व्हावा

SCROLL FOR NEXT