Kesar Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Kesar Mango : सोलापूर जिल्ह्यातील हवामान केशर आंब्यासाठी पोषक

आंबा पिकामध्ये खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापनाला अतिशय महत्त्व आहे.

Team Agrowon

Solapur Mango News : जिल्ह्यात आंबा लागवड (Mango Cultivation) वाढत आहे. जिल्ह्यातील हवामान केशर आंब्याच्या जातीसाठी (Mango Verity) पोषक असल्याचे प्रतिपादन डॅा. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॅा. महेश कुलकर्णी यांनी जेऊर (ता. अक्कलकोट) येथे केले.

निवृत्त कृषी उपसंचालक विजयकुमार बरबडे यांच्या जेऊर येथील विजयराज केशर मँगो फार्ममध्ये आयोजित शिवारफेरीवेळी श्री. कुलकर्णी बोलत होते. यावेळी विजयकुमार बरबडे, श्रीशैल चौलगे, संजय गुरव, सिद्रामप्पा जेटगी, धनंजय गायकवाड, अरविंद वाघ, उपस्थित होते.

श्री. कुलकर्णी म्हणाले, की आंबा पिकामध्ये खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापनाला अतिशय महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी त्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी, एकूणच व्यवस्थापनावरच आंब्याची गुणवत्ता आणि दर्जा टिकून राहणार आहे. त्यामुळे त्यावर भर द्या, असे सांगितले.

यावेळी त्यांनी आंबा पिकातील विविध जाती, आंबा छाटणी तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन यावर तांत्रिक मार्गदर्शन केले.

यावेळी आंब्याच्या प्रत्यक्ष छाटणीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. श्री. बरबडे यांनी जिल्ह्यातील बदलत्या हवामानामुळे दिवसा उच्चांकी तापमान आणि रात्री कडाक्याची थंडी पडत असल्याने आंबा पिकामध्ये पुनर्मोहर येण्यास सुरवात झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Smart Village : कुंभारी झाले सुंदर, पर्यावरणपूरक हरितग्राम

Flood Prevention : नदी, ओढे, नाल्यांतील अतिक्रमण आणि पूर समस्या

Ativrushti Madat : २ ते ३ हेक्टरच्या नुकसानीपोटी १२० कोटींची मदत मंजूर; ८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत

Rabbi Anudan GR : रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपयांचा शासन निर्णय जारी; मदत कोणत्या जिल्ह्यांसाठी?

Crop Loss Compensation: अमरावतीला दिलासा; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५७० कोटींची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT