Mango Cashew Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : बदलत्या हवामानाचा आंबा, काजू पिकांवर परिणाम शक्य

Mango Cashew Crop : पहाटे थंडी आणि धुके, तर दुपारी उन्हाचा कडाका असे वातावरण जिल्ह्यात असून, कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक होत आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : पहाटे थंडी आणि धुके, तर दुपारी उन्हाचा कडाका असे वातावरण जिल्ह्यात असून, कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक होत आहे. या वातावरणाचा आंबा, काजू पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात सारखे बदल दिसून येत आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअस इतके आहे.

कमाल आणि किमान तापमानात २० अंश सेल्सिअसचा फरक असल्याचा विपरीत परिणाम आंबा, काजू पिकांवर होण्याची शक्यता आहे. त्यातच वारंवार धुके पडत असल्यामुळे या पिकांवर कीड-रोगांचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे.

काजू पिकांमध्ये सध्या काजू बी आणि बोंड पोखरणाऱ्या अळीचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. या बदलत्या वातावरणामुळे आणखी कीड-रोग वाढण्याची शक्यता असल्याने आंबा, काजू बागायतदारांची धास्ती वाढली आहे.

सतत बदलणाऱ्या वातावरणाचा काजू पिकावर परिणाम झाला आहे. फुलकिडे, फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याचा उत्पादनावर देखील परिणाम होणार आहे.
- प्रमोद लोके, काजू बागायतदार, खांबाळे, ता. वैभववाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Alert: मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Rain Crop Damage: पावसामुळे १४९० हेक्टरला फटका

Milk Regulation: उत्पादक, विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक

Unseasonal Rain Impact: पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

SCROLL FOR NEXT