ॲग्रो विशेष

Fungus Smuggling : चीनकडून अमेरिकेला धोका

Agro Terrorism : अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ (एफबीआय) नुसार लिऊ हा गेल्या वर्षी अमेरिकेत आला, तेव्हा त्याच्या बॅगेत ही बुरशी ठेवलेल्या काही लहान पिशव्या सापडल्या.

Team Agrowon

Washington News : अमेरिकेत पिकांचा नाश करणाऱ्या बुरशीची तस्करी केल्याचा आरोप दोन चिनी संशोधकांवर काही दिवसांपूर्वी झाला. या घटनेनंतर जर अमेरिकेने काळजी घेतली नाही तर कोरोनाच्या साथीपेक्षा काहीतरी वाईट होऊ शकते, असा इशारा येथील चीनसंबंधीचे तज्ज्ञ गॉर्डन जी चँग यांनी दिला आहे. तसेच अमेरिकेने चीनबरोबरील संबंध तोडावेत, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

युनकिंग जियान (वय ३३) आणि झुन्योंग लिऊ (वय ३४) या संशोधकांनी गव्हाचे पीक उद्ध्वस्त करण्यास सक्षम असलेल्या फ्युझारियम ग्रॅमिनिअरम या बुरशीची चोरटी आयात अमेरिकेत केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. या बुरशीचा वापर संभाव्य कृषी दहशतवादाचे शस्त्र म्हणून केला जाऊ शकतो.

या दोन चिनी संशोधकांवर कट रचणे, तस्करी करणे, खोटी माहिती देणे आणि व्हिसा गैरप्रकार, असे आरोप आहेत. या बुरशीमुळे शेतातील पिकांवर विशेषतः गहू, बार्ली आणि ओट्सवर ‘फ्युझारियम हेड ब्लाइट’ (एफएचबी) ज्याला ‘स्कॅब’ असे म्हटले जाते हा बुरशीजन्य रोग होतो.

अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ (एफबीआय) नुसार लिऊ हा गेल्या वर्षी अमेरिकेत आला, तेव्हा त्याच्या बॅगेत ही बुरशी ठेवलेल्या काही लहान पिशव्या सापडल्या. या बुरशीतील घटकांबद्दल माहिती नसल्याचा दावा लिऊ याने केला आहे. जियान जिथे काम करत होता त्या मिशिगन विद्यापीठातील प्रयोगशाळेत संशोधनासाठी या बुरशीचा वापर करण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले होते.

कृषितज्ज्ञांचा वेगळा सूर

फ्युझारियम ग्रॅमिनिअरम या बुरशीमुळे अमेरिकेला घातक परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा चँग यांनी दिला असला तरी अमेरिकेतील कृषितज्ज्ञांनी वेगळी भूमिका घेतली आहे. ही बुरशी अमेरिकेत गेल्या दशकापासून अस्तित्वात आहे. कीटकनाशके फवारून ती रोखता येते. पण वारंवार आणि मोठ्या प्रमाणात पोटात गेल्यासच ती धोकादायक ठरू शकते.

एक शस्त्र म्हणून ती कुचकामी ठरेल, असे अर्बाना-चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठातील पीक विज्ञान प्राध्यापक, गहू उत्पादक आणि अनुवंशशास्त्रज्ञ जेसिका रुटकोस्की यांनी ‘रॉयटर्स’शी बोलताना सांगितले. बुरशीच्या विषाची व्यापक चाचणी, बुरशीनाशकांचा व्यापक वापर आणि जाणूनबुजून संसर्ग निर्माण करण्यातील अडचण यामुळे ते एक अर्धवट शस्त्र बनेल, असे रुटकोस्की आणि इतर संशोधकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri College Land Issue: कृषी महाविद्यालयातील आठ एकर जमीन नापीक

Hingoli Turmeric Market: हिंगोली बाजार समितीत हळदीची ३ लाख १९ हजार क्विंटल आवक

Fuel and Fertilizer Prices: इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार

Cotton Procurement Policy: कापूस खरेदीऐवजी भावांतर राबविणार

Maharashtra Heat Update: राज्यात उष्णतेची लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT