Solapur Chimney agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Chimney : सोलापूरची चिमणी अखेर मातीत, कशी पडली पहा video

Siddheshwar Sugar Factory सोलापूर विमानतळासाठी अडथळा ठरणाऱ्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी आज जमीनदोस्त झाली. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एक किलोमीटरच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आले होते.

Team Agrowon

Solapur Chimney Demolish : सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar Factory) को जनरेशनची चिमणी अखेर पाडण्यात आली. या चिमणीमुळे सोलापूर शहर आणि परिसरातील राजकीय वातावरण तापलं होतं. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही चिमणी जमीनदोस्त करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर शहर आणि परिसराचे राजकारण सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याभोवती फिरत राहिले. या कारखान्याच्या विस्तारीकरणातून 2014 साली सह वीज निर्मितीसाठी 92 मीटर उंचीची चिमणी उभारण्यास सुरुवात केली. पण ही चिमणी अनधिकृत असल्याची तक्रार करण्यात आली होती. महापालिका प्रशासन कारवाई करण्यासाठी गेले असता शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला होता. आता सोलापूरात विमानसेवा सुरू करण्यासाठी ही चिमणी अडथळा ठरत होती. दरम्यान, सोलापूर महापालिका आयुक्तांनी स्वतंत्र सुनावणी घेत चिमणी पाडण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन पक्ष आमने-सामने आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी तर पत्र लिहून चिमणी पाडण्यास विरोध केला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकच चर्चा रंगू लागली होती. अखेर प्रशासाने पाडण्याचे आदेश दिल्याने परिसरातील तणावाचे वातावरण होते. त्यामुळे सुमारे २ हजार पोलीस तैनात करण्यात आल्याने कारखाना परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात आला.

चिमणीच्या पायाजवळ जेसीबीनं खड्डे खणले जाऊ लागले. तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं, की जिलेटीननं स्फोट करणार. परंतु चेन्नईहून आलेले दोन खास टेक्निशियन दीड-दोनशे फूटवर सरसर चढत जाऊन जागोजागी ड्रिल मारु लागले. तेव्हा सारे अधिकच गोंधळले.

सकाळी ८.३० वाजता चिमणीला जोडलेले बॉयलर व गाळपाचे कनेक्शन जेसीबीद्वारे तोडण्यात आले. त्यानंतर दिवसभर चिमणीचा मूळ पाया कमकुवत करण्यासाठी छिद्रे पाडण्यात आली. त्यानंतर ती क्रेनच्या साहाय्याने पाडण्यात आली. यावेळी कारखान्याबाहेर कामगार, शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : मुसळधारेने काही तासांत होत्याचे नव्हते

Onion Rate Crisis : कशी फुटेल कांदादर कोंडी?

Fertilizer Stock Mismatch : खत विक्री, प्रत्यक्ष साठ्यात तफावत असल्यास कारवाई

Onion Storage Rot : चाळीस टक्के कांद्याची चाळीतच नासाडी

ICAR Farmer Award : ‘आयसीएसआर’ शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणार

SCROLL FOR NEXT