CM Vayoshri Yojana agrowon
ॲग्रो विशेष

CM Vayoshri Yojana : ६५ वर्षांवरील नागरिकांना "मुख्यमंत्री वयोश्री योजना", असा करा अर्ज

sandeep Shirguppe

Department of Social Welfare Maharashtra : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी "मुख्यमंत्री वयोश्री योजना" सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य दिले जाते. पात्र लाभार्थ्यांना ३ हजार रुपयांचे एकरकमी बँक खात्यात पैसे जमा केले जातात.

या योजनेचा लाभ घेणेसाठी पात्र लाभार्थ्यांसाठी अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा व क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध करुन दिले आहेत. या योजनेचा लाभ घेणेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, रेशन कार्ड व स्वयं-घोषणापत्र अशी आहेत.

यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, कंबर बेल्ट, इ. सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करता येणार आहेत. तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एक रकमी तीन हजार पात्र लाभार्थ्यांना बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण करण्यात येणार आहे.

या करीता राज्यात "मुख्यमंत्री वयोश्री योजना" राबविण्यास मा. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT