CM Eknath Shinde agrowon
ॲग्रो विशेष

CM Eknath Shinde : परतीच्या पावसाचा धुमाकूळ; तातडीने पंचनामे करण्यासह नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Maharashtra Rain News : सध्या राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक हातचं गेलं आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळी झालं असून शेतं पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यासह शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यात परतीच्या पावसाने विविध ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, कोकण पट्ट्यातील जिल्ह्ये आणि मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतं पिकांना पावसाचा फटका बसला आहे. आधीच ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाच्या नुकसानीतून शेतकरी सावरतो न सावरतो तोच आता परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान केले आहे. यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

पिकांना मोठा फटका

परतीच्या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला असून अनेक ठिकाणी शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विविध ठिकाणी कापणी करून ठेवलेल्या पीकाचे नुकसान झाले आहे. विशेषतः भात, सोयाबीन, तूर, कपाशी पिकाला फटका बसला आहे. तर या पावसातून ऊस देखील वाचलेला नाही. यामुळे पुणे, कोल्हापूर, सांगली, कोकण, नाशिक आणि मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी सरकारकडे केली होती.

याप्रमाणे आता विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांच्या पंचनामे आणि नुकसान भरपाईसाठी देण्यासाठी नुकसानग्रस्त गावांमध्ये त्वरित यंत्रणा कार्यरत करावी, संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही, शिंदे यांनी दिले आहेत.याचबरोबर शिंदे यांनी यावेळी जिल्हास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तालुकास्तरीय यंत्रणा, इतर सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT