Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : ‘छत्रपती’चे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Sugar Factory Update : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये ११ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे

Team Agrowon

Walchandnagar News : ‘‘श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये ११ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,’’ अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी दिली.

भवानीनगर (ता. इंदापूर) येथील छत्रपती कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी टाकण्याच्या कार्यक्रमामध्ये जाधव बोलत होते. या वेळी ते म्हणाले, की गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने कारखान्याकडून सर्व तयारी झाली आहे.

यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात २१ हजार ४८१ एकर ऊस गळीतास उपलब्ध असून आठ लाख टन ऊस गळीतास उपलब्ध होईल. तसेच कार्यक्षेत्राबाहेरील ३ लाख टन गेटकेन ऊस उपलब्ध होऊन ११ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी दररोज ९५०० ते १० हजार टन उसाचा पुरवठा होईल. असे ऊस तोडणी व वाहतुकीचे नियोजन केले आहे.

या वेळी कारखान्याचे विकास क्षीरसागर व पूनम क्षीरसागर, हनुमंत करवर व स्वाती करवर यांच्या बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी, जालिंदर शिंदे यांचे हस्ते काटापूजन करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक बाळासाहेव पाटील, दत्तात्रेय सपकळ, राजेंद्र गावडे, संतोष ढवाण, सर्जेराव जामदार, नारायण कोळेकर, बाळासाहेब सपकळ, रसिक सरक, निवृत्ती सोनवणे , कामगार नेते युवराज रणवरे, माजी संचालक भाऊसाहेब सपकळ, तानाजी थोरात, विशाल निबांळकर, अमरसिंह कदम, प्रशांत पवार , शिवाजी रुपनवर, अमोल भोईटे,वसंत जगताप उपस्थित होते.

छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ८६०३२ व इतर उच्च साखर उतारा देणाऱ्या ऊस जातीची लागवड वाढविण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्रात ८६०३२ या जातीच्या ऊस क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. त्याचा निश्चित फायदा साखर उतारा वाढण्यामध्ये होणार आहे. या वर्षी उसाचे चांगले गाळप झाले तर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार होईल.
प्रशांत काटे, अध्यक्ष, छत्रपती साखर कारखाना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT