Chemical Fertilizers agrowon
ॲग्रो विशेष

Chemical Fertilizers : सरकारच्या विधेयकाविरोधात रब्बी हंगामाच्या तोंडावर राज्यातील खते, बियाणांची दुकाने राहणार बंद

Agricultural Shopkeeper : राज्यातील कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सध्या पुरसे कायदे असताना, राज्य शासनाने नवीन विधेयक आणले आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Agriculture News : राज्यातील कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सध्या पुरसे कायदे असताना, राज्य शासनाने नवीन विधेयक आणले आहे. त्यातील जाचक अटींमुळे कृषी निविष्ठा विक्री करणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे संभाव्य विधेयकाविरोधात आवाज उठविण्यासाठी २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील सर्व रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशक विक्रेते बंद पाळण्यात येणार आहे.

याबाबतची अशी माहिती असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी- बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, "राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेते खते, बी-बियाणे, कीटकनाशक स्वतः तयार करीत नाहीत. विविध कंपन्यांनी तयार केलेल्या उत्पादनांचे सीलबंद पॅकेटची विक्री करतात. त्या पॅकेटमधून संबंधित कंपनीने सदोष उत्पादन घातले असेल किंवा अनावधानाने काही दूषित घटक मिक्स झाले असतील, तर त्याबाबत विक्रेत्याला दोषी ठरवणे योग्य होणार नाही. तसे झाल्यास कायदेशीर कारवाईसंदर्भात प्रचलित कायदे आहेत.

तरीही राज्य शासन नवीन विधेयक आणत आहे. या नव्या विधेयकात निविष्ठा विक्रेत्यावर अजामीनपात्र गुन्हा नोंद होऊ शकतो व तीन महिने त्याला तुरुंगात बसावे लागेल. कृषी निविष्ठेसंदर्भातील तक्रार शेतकऱ्यांनी कृषी खते सोडून पोलिसांत तक्रार करण्याची तरतूद आहे; मात्र कृषी निविष्ठेसंदर्भातील तक्रार कृषी अधिकाऱ्यांकडे करावी, अशी मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biochar Production: कर्ब संवर्धनासाठी पीक अवशेषांपासून बायोचार निर्मिती

Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

Armyworm in Maize: मक्यातील लष्करी अळीचा करा नायनाट; कीड व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती

Great Indian Bustard: माळढोक अभयारण्याच्या राखीव क्षेत्रात सोडले घातक रसायन 

Lumpy Disease: मोहोळमध्ये ‘लम्पी स्कीन’ने दोन जनावरांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT