Farmer Fraud
Farmer Fraud Agrowon
ॲग्रो विशेष

Green House : हरितगृह उभारणीत शेतकऱ्याची फसवणूक

Team Agrowon

अमळनेर, जि. जळगाव : शेतात हरितगृह (Greenhouse) उभारण्यासाठी रक्कम घेऊनही काम पूर्ण न करणाऱ्या दोघांना ग्राहक मंचाने (Consumer Forum) नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. अशोक वना बाविस्कर (रा. गांधली, ता. अमळनेर) यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार, त्यांनी शेतात २० गुंठे जागेत हरितगृह उभारणी करण्यासाठी सचिन उत्तम मोरे, समृद्धी ग्रीन हाऊस, समृद्धी ग्रीन हाऊस कन्स्ट्रक्शन यांना काम दिले होते. यासाठी त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ७२० रुपये प्रति स्के.मीटरप्रमाणे काम देऊन ११ हजार रुपये बेणे देण्यात आले. तसेच दोन धनादेश देऊन पाच लाख रुपये देण्यात आले होते.

तर उर्वरित ६ लाख ८० हजार रुपये शासकीय अनुदान आल्यावर देण्याचे ठरून कामाचा करारनामा करण्यात आला होता. त्यानुसार तक्रारदाराने २ लाख २० हजार रुपयांचे साहित्य आणून कामास सुरवात केली होती. मात्र, कंपनीने फक्त पाइप आणून खड्डे खोदले होते. त्यानंतर काम अपूर्ण सोडण्यात आले.

तक्रारदाराने कंपनीशी वारंवार संपर्क साधला. मात्र त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारदाराने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करून झालेल्या नुकसानीच्या भरपाई व्याजासह ३८ लाख ३१ हजार रुपये मिळावेत, अशी मागणी केली होती.

त्यानुसार पूनम मलिक (सदस्या) तसेच प्रभारी अध्यक्षा व सुरेश जाधव (सदस्य) जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जळगाव यांनी समृद्धी ग्रीन हाऊस कन्स्ट्रक्शन व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधी सचिन उत्तम मोरे यांना तक्रारदाराला ५ लाख ६९ हजार ४५० रुपये तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम देईपर्यंत ९ टक्के व्याजाने परत करावेत. तसेच झालेल्या त्रासाबद्दल ५० हजार व अर्जाचा खर्च ५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. तर यातील तिसरे संशयित जिल्हा कृषी अधिक्षकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तक्रारदाराकडून ॲड. भारती अग्रवाल यांनी युक्तिवाद केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT