Atul Save Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance: फळपीक विमा योजनेत बदल करावा

Swabhimani Farmers Demand: अवेळी गारपीट, अतिवृष्टी आणि हवामान बदलामुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु सध्याच्या विमा योजनेतील कालमर्यादित अटीमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहतात.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News: पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ सहभागी शेतकऱ्यांना व्हावा यासाठी ठरावीक कालावधीची अट काढून विमा हा संपूर्ण पीक कालावधीसाठी लागू करावा तसेच गारपीट हा विषय या योजनेचा अनिवार्य भाग करण्यात यावा.

असा धोरणात्मक बदल करून योजनेतील शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली.

फळपीक विमा योजनेत पाऊस, वादळ-वारा, तापमान व गारपीट यासाठी ठरावीक कालावधीची अट आहे. परंतु वातावरण बदलामुळे अवेळी येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे ठरावीक कालावधीच्या अटींची पूर्तता होत नसल्याने शेतकरी फळपीक विमा योजनेत सहभागी होऊन सुद्धा त्याच्या लाभापासून वंचित राहत आहेत.

फळपिकासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते आणि त्यासाठी कर्ज घ्यावे लागत असल्याने आणि नुकसान होऊन जर फळपीक विमा योजनेचा लाभ मिळत नसेल तर कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न आहे.

अतिवृष्टी, अल्पवृष्टी, वादळ, गारपीट अशी नैसर्गिक संकटे कालमर्यादेत न राहता वर्षभरात कधीही धडकत आहेत. त्यामुळे याचा सगळ्यात जास्त मोठा आर्थिक फटका फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT