Farm Loan Denied: बॅंकांनी कर्ज नाकारल्याने शेतकरी सावकारांच्या दारात

Farmer Issue: बॅंकांनी कर्ज नाकारल्याने मागील सहा महिन्यांत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी सावकारांकडे धाव घेतली आहे. जवळची स्थावर मालमत्ता तारण ठेवून या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Amravati News: बॅंकांनी कर्ज नाकारल्याने मागील सहा महिन्यांत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी सावकारांकडे धाव घेतली आहे. जवळची स्थावर मालमत्ता तारण ठेवून या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर अमरावती जिल्ह्यातील ३६ हजार ६०० जणांनी बिगर कृषी कर्ज घेतले असले तरी यामध्ये शेतकऱ्यांचा समावेश सर्वाधिक आहे.

महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये खासगी सावकारांना कृषी व बिगर कृषी कर्ज वितरणाची परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तारण ठेवल्यास त्यावर नऊ टक्के व्याजदर असून विनातारणावर १२ टक्के व्याज लागू आहे. तर बिगर कृषी कर्जासाठी तारणावर १५ व तारणाशिवाय १८ टक्के व्याज आकारण्याची अनुमती आहे.

Crop Loan
Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा; कर्जे थकित

यंदाच्या खरीप हंगामात राष्ट्रीय बॅंकांसह खासगी बॅंकांनी कर्ज वितरणात आखडता हात घेतल्याने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी गतवर्षीचे पीककर्ज चुकवले नसल्याने त्यांना कर्ज मिळणार नाही. त्यामुळे त्यांनीही सावकारांच्या दारात हजेरी लावली आहे.

सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात ३६ हजार ७६९ शेतकऱ्यांनी बिगर कृषी कर्ज घेतले आहे. यातील १६८ जणांनी तारण न देता ६५.१४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून उर्वरित ३६ हजार ६०१ जणांनी स्थावर मालमत्ता गहाण ठेवत तब्बल १२१ कोटी ०८ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. कृषी कर्ज घेणाऱ्यांची संख्या निरंक दाखविण्यात आली असली तरी यातील बहुतांश कर्जदार शेतकरी वर्गातील आहेत. तारणावर कर्ज घेतल्याने त्यांना नऊ टक्के व्याज आकारण्यात येणार आहे.

Crop Loan
Farm Loan Interest Refund: शेतकऱ्यांना व्याज परतावा न देणाऱ्या बँकांची चौकशी

अल्प, अत्यल्प भूधारक कर्जापासून वंचित

यंदाच्या खरीप हंगामात १६५० कोटी रुपये पीककर्जाचा लक्ष्यांक अमरावती जिल्ह्यासाठी आहे. एक एप्रिलपासून कर्ज वितरणास प्रारंभ झाला असून एप्रिल व मे महिन्यात ८४५ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. यामध्ये राष्ट्रीय बॅंकांचा हिस्सा २३६ कोटी व खासगी बॅंकांचा १५.८२ कोटी रुपये इतकाच आहे.

जिल्हा बॅंकेने मात्र आघाडी घेत ५८६ कोटी रुपयांचे वितरण केले आहे. कर्ज वितरणाचे एकूण प्रमाण ५१ टक्के आहे. यंदा सीबिल न बघता कर्ज देण्याचे आदेश असले तरी बॅंकांनी शेतकऱ्यांवरील बोजा तपासून कर्ज वितरण केल्याने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या कर्जापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

सावकारी कर्ज वितरणाची स्थिती

एकूण सावकार : ४६५

कर्जदार संख्या (तारण) : ३६,६०१

बिगर तारण : १६८

कर्ज वितरण : १२१.७२ कोटी

शेतकऱ्यांसाठी व्याजदर : तारणावर : नऊ टक्के, विनातारण : १२ टक्के

बिगर कृषी : तारणावर : १५ टक्के, बिगर तारण : १८ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com