Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Protest : कांदा निर्यातबंदीविरोधात ‘प्रहार’चे चांदवडला आंदोलन

Onion Export Ban : निर्यातबंदीच्या निर्णयाने दर कोसळले. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष पुन्हा आक्रमक झाला.

Team Agrowon

Nashik News : केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. निर्यातबंदीच्या निर्णयाने दर कोसळले. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष पुन्हा आक्रमक झाला.

कांदा निर्यातबंदी विरोधात शेतकऱ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत केंद्र सरकारने लागू केलेली निर्यातबंदी तत्काळ हटवावी, कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून द्यावे, नंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यात यावे, असा इशारा पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी दिला.

चांदवड येथे सोमवारी (ता. १) कांदा निर्यातबंदी विरोधात ‘प्रहार’तर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून कांदा निर्यातबंदी विरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

शासकीय विश्रामगृह येथून ही अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात प्रतीकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आले. सरकारने निर्यातबंदी करून कांदा उत्पादकांवर अन्याय केला असून निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने त्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. चांगल्या भावात कांदा विक्री होत असताना एका रात्रीत केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून हा तोटा सरकारने त्वरित भरून द्यावा व कांदा निर्यातबंदी उठवावी,

कांदा निर्यातबंदी हटवून निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून द्यावे, बँकाची व फायनान्सची कर्जवसुली त्वरित थांबवावी, पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार जे. एस. केदारे यांच्याकडे देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT