Kolhapur Sangli Chandoli Dam : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चांदोली धरणग्रस्तांनी मागच्या काही दिवसांपासून वनविभागाच्या कार्यालयाच्या दारात ठिय्या मांडला होता. दरम्यान जमीनी देण्याच्या निर्णयानंतर धरणग्रस्तांनी ठिय्या आंदोलन मागे घेत गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. भारत पाटणकर यांनी पुन्हा सरकारला इशारा दिला आहे.
श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा ३९ वा दिवस आहे. येथील वनविभागाच्या प्रांगणात शंभरावर प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्त चांदोली अभयारण्याकडील मूळ गावी पायी चालत निघाले आहेत. त्यांचा आजचा मुक्काम कोकरूड (जि. सांगली) येथे होता येथे डॉ. पाटणकर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
चांदोली प्रकल्पग्रस्तांची भावकी व महिला एकत्र येऊन येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवतील, याचा विचार करून सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य कराव्यात, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.
डॉ. पाटणकर म्हणाले की, 'लाँग मार्चचा ९ वा दिवस आहे. आता आपले आंदोलन मुंबईच्या सचिवालयाला भूकंपाचे धक्क्याप्रमाणे जाणीव करून देणारे असेल.
चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत सरकारने दखल घ्यावी. अन्यथा आमच्या विचारांच्या पक्ष, संघटनांची एकजूट बळकट होत आहेत. येत्या निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.'
डी. के. बोडके, मारुती पाटील, दाऊद पटेल, जगन्नाथ कुडतुडकर, विनोद बडदे, एम. डी. पाटील, प्रमिला नांगरे, अमिना पटेल उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.