Rain Updatea Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : दोन दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Nashik Weather : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवसांचा अंदाज लक्षात घेता पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहील. शनिवारी (ता. २५) हलका व रविवारी (ता. २६) मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवसांचा अंदाज लक्षात घेता पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहील. शनिवारी (ता. २५) हलका व रविवारी (ता. २६) मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार व्यक्त करण्यात आला आहे, अशी माहिती फुले कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्र, इगतपुरी यांच्याकडून देण्यात आली.

२२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत कमाल तापमान ३२-३४ अंश सेल्सिअस व किमान तापमान १४-१६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग ७-१४ कि.मी./तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. २४) काही ठिकाणी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस तसेच शनिवारी (ता. २५) एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रतितास वेग) वाहण्याची अधिक शक्यता असल्या कारणाने आपल्या पशुधनाचे व स्वतःचे संरक्षण करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

शनिवारी आणि रविवारी असा दोन दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता, मळणी केलेली खरीप पिके तसेच वेचणी केलेला कापूस व कापणी राहिलेल्या (भात, नागली) पिकांना प्लॅस्टिक पेपर किंवा ताडपत्रीने झाकावे किंवा सुरक्षित जागेवर ठेवावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : पाणीटंचाई टाळण्यासाठी वर्षभराचे नियोजन करा; पालकमंत्री जयकुमार गोरे

Goat Farming : शास्त्रीय व्यवस्थापनातून शेळीपालनात शाश्वत उत्पन्न

Rain Updates : पावसाची जोरदार हजेरी; हलका दिलासा

Kisan Sabha Protest: मंत्र्यांना तहसीलदारांमार्फत काजू, बदाम पाठवत संताप व्यक्त, किसान सभेची राज्यभर आंदोलने

Crop Damage : पिके वाया गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

SCROLL FOR NEXT