Pune News : उत्तर प्रदेश केडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी डॉ. देवेश चतुर्वेदी यांची केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चतुर्वेदी १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून सध्या ते उत्तर प्रदेशमध्ये कार्यरत आहेत. चतुर्वेदी यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव एसपी गोयल यांच्याही बदलीचे आदेश काढण्यात आले मात्र ते सध्या कोठेच जाण्याच्या तयारीत नसल्याचे बोलले जात आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियोक्ता समितीने याबाबत ६ ऑगस्ट रोजी आदेश जारी केले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, समितीने चतुर्वेदी यांची कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.
कोण आहेत आयएएस डॉ. देवेश चतुर्वेदी?
देवेश चतुर्वेदी हे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६६ रोजी झाला. चतुर्वेदी लखनौचे रहिवासी असून त्यांचे एम.टेक (आययआटी) पीजीपीपीएम (आयआयटी) पीएच.डी असे शिक्षण झाले आहे. आयएएस अधिकारी झाल्यानंतर चतुर्वेदी यांना १९९१ मध्ये इटावा येथे कार्यकारी जिल्हाधिकारी म्हणून पहिली जबाबदारी मिळाली. त्यानंतर त्यांनी सीडीओ रायबरेली, पिथौरागढ, देवरिया, बुलंदशहर, कानपूर देहाट, गोरखपूर, प्रयागराज येथे दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली. तसेच २००७ ते २००९ या काळात त्यांनी केंद्रातही महत्वाची जबाबदारी पार पाडली.
तर सध्या चतुर्वेदी लखनौ येथे एसीएस नियुक्त्या आणि कार्मिक विभाग, कृषी, कृषी शिक्षण आणि संशोधन आणि कृषी विपणन विभाग, कृषी विदेशी व्यापार आणि निर्यात प्रोत्साहन विभाग, डिजी प्रशिक्षण विभागाचे अध्यक्ष, दक्षता आयोग, प्रशासकीय न्यायाधिकरणाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.