Sugar Factory Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory Maharashtra : राज्यातील ४५ साखर कारखाने बंद करण्याचे आदेश, हंगाम सुरू होण्यापूर्वीच मोठा झटका

Central Pollution Board : केंद्रिय प्रदुषण मंडळाने महाराष्ट्र प्रदुषण मंडळाला राज्यातील ४५ साखर कारखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

sandeep Shirguppe

Maharashtra Pollution Board : राज्यातील साखर कारखाने १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु केंद्रिय प्रदुषण मंडळाने महाराष्ट्र प्रदुषण मंडळाला राज्यातील ४५ साखर कारखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पर्यावरण संरक्षण कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात यावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील सहकारी साखर कारखानदारांना हंमाम सुरू होण्यापूर्वीच मोठा झटका बसला आहे.

महाराष्ट्रातील २१० सहकारी साखर कारखान्यांपैकी १०५ कारखान्यांमध्ये गळीत हंगाम सुरू होणार आहे. दरम्यान राज्यातील ४५ कारखान्यांना प्रदुषन मंडळाने नोटीस दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राज्यातील अनेक साखर कारखाने प्रदुषनाचे निय पाळत नसल्याची बाब कित्येक वेळा समोर आली होती. यामुळे अनेक जिल्ह्यातील नद्यांवर थेट परिणाम झाला आहे.

दरम्यान ४५ साखर कारखान्यांनी पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्यास या कायद्याच्या कलम ५ नुसार कोणताही कारखाना कारखाना बंद करणे, कारखान्याची वीज, पाणी तोडणे तसेच अन्य सुविधा बंद करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कमलेश सिंग यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या ४५ कारखान्यांना भेट देऊन पाहणी करून सत्यस्थिती जाणून घ्यावी. गंभीर उल्लघंन करणारे कारखाने बंद करण्याची प्रक्रिया निश्चित करावी तसेच वीज तोडण्याचे निर्देश महावितरणला द्यावेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आदेश रद्द झाल्याशिवाय यातील कोणत्याही कारखान्याचा हंगाम चालू होणार नाही, असे पहावे. याचा अहवाल १० नोव्हेंबरपर्यंत द्यावा, असे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पाठविलेल्या या पत्रात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT