E- NAM Platform Agrowon
ॲग्रो विशेष

E- NAM Platform : ई-नामवर १० शेतमालाचा करण्यात आला समावेश; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय

Agricultural Market : देशभरात २०१६ मध्ये ई-नाम या इलेक्ट्रॉनिक व्यापारी पोर्टलची सुरुवात करण्यात आली. यामध्ये देशातील बाजार समितीना जोडण्यात आले. त्यातून राष्ट्रीय पातळीवर शेतमालाचे एक व्यवस्था निर्माण करण्यात आले.

Dhananjay Sanap

Agricultural Commodities : केंद्रीय कृषी मंत्रालयाने १० शेतमालाचा ई-नांमवर समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ई-नामवर एकूण २३१ शेतमालाची खरेदी विक्री करता येणार आहे. नव्याने समावेश करण्यात आलेल्या १० शेतमालामध्ये तुळशीचे पान, हरभरा पीठ, गव्हाचे पीठ, भाजलेले हरभरा पीठ, ओला तांबूस पिंगट पीठ, हिंग, वाळलेली मेथीची पाने, बेबी कॉर्न, ड्रॅगन फळ आणि ओला तांबूस पिंगट या शेतमालाचा समावेश करण्यात आल्याचं मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगण्यात आलं आहे.

भागीदारांसह राज्याचे एजन्सी, व्यापारी, तज्ञ आणि छोट्या शेतकऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे. यामधील भाजलेले हरभरा पीठ, वाळलेली मेथी पाने, तांबूस पिंगट आणि हिंग या शेतमालाची गणना दुय्यम व्यापार वर्गात केली जाते. त्यामुळे या शेतमालाचे मूल्यवर्धन करून शेतकरी उत्पादक कंपन्या फायदा होऊ शकतो, असा दावा पत्रकात करण्यात आला आहे.

देशभरात २०१६ मध्ये ई-नाम या इलेक्ट्रॉनिक व्यापारी पोर्टलची सुरुवात करण्यात आली. यामध्ये देशातील बाजार समितीना जोडण्यात आले. त्यातून राष्ट्रीय पातळीवर शेतमालाचे एक व्यवस्था निर्माण करण्यात आले.

ई-नाममध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या या शेतमालाची गुणवत्तेचे निकष पणन आणि तपासणी संचानालयाकडून ठरवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळून फायदा होईल, असा दावा मंत्रालयाचा आहे. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर या शेतमालाचा समावेश करण्यामागे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा आणि त्यातून व्यवहारात पारदर्शकता यावी हाच आहे, असंही मंत्रालयाने सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होईल. या शेतमालासोबतच इतरही शेतमालाचा यामध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता; बहुतांश भागात उघडीप कायम राहणार

Kharif Crop Damage: पावसाअभावी बीड जिल्ह्यात ४.८४ लाख हेक्टरवर नुकसान

Rotary Mulcher: ट्रॅक्टरचलित रोटरी मल्चर

Swabhimani Shetkari Sanghatana: ‘स्वाभिमानी’ची १० ऑक्टोबरला ऊस परिषद

Hydroponic System: हायड्रोपोनिक्स शेतीसाठी आवश्यक प्रणाली

SCROLL FOR NEXT