amit shah raju shetti agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Rate : साखरेच्या दराची केंद्र सरकारने चौकशी करावी; राजू शेट्टींचे अमित शाह यांना पत्र

Amit Shah : साखर कारखाने व व्यापारी यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

sandeep Shirguppe

Raju Shetti Letter Amit Shah : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. यानंतर साखरेचे दर प्रतिक्विंटल ३ हजार १०० रुपयापर्यंत खाली आले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू लागला आहे. सध्या बाजारात साखरेचा दर हा प्रतिक्विंटल ४ हजार रुपयापर्यंत आहे. यामुळे केंद्र सरकारच्या सहकार विभाग व अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाने तातडीने चौकशी करावी. तसेच संबंधित साखर कारखाने व व्यापारी यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा व केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे शनिवार (ता.१४) केली आहे.

शेट्टीनी केंद्रीय सहकार मंत्रालयाला पत्रात दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, विदर्भ व कर्नाटकमधील ज्या कारखान्यांची रिकव्हरी कमी आहे व आर्थिक अडचणीत आहेत असे कारखाने कमी दराने साखर विक्री करू लागले आहेत.

गेल्या महिन्याभरामध्ये ज्या कारखान्यांनी साखर विक्री केली आहे, ती किती रूपये दराने विकली व ज्या व्यापाऱ्यांनी ती साखर खरेदी केली आहे. ती साखर कोणत्या बाजारात किती दराने विक्री केली आहे. याची सखोल चौकशी केल्यास बिंग फुटणार आहे. काही कारखानदार व साखरेचे मोठे व्यापारी मिळून शेतकरी व ग्राहकांना लुबाडत असून या साखर विक्रीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शेट्टी यांनी पत्राद्वारे केली आहे.

कारखान्यांच्या गोदामामध्येच साखर...

याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर साखर कारखान्यांचा साखर विक्रीचा दर ३ हजार १०० रूपयापर्यंत खाली आलेला आहे. सध्या बाजारात व्यापारी प्रतिकिलो ३७ रूपयांनी दुकानदारांना साखरेची विक्री करत आहे. दुकानदाराकडून ग्राहकांना प्रतिकिलो ४० रूपयांनी साखर विकली जात आहे. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील काही खासगी व सहकारी साखर कारखानदारांचे नातेवाईकच साखरेचे व्यापारी आहेत. साखर कारखान्यांकडून कमी दराने विकलेली साखर बाजारात येत नसून ती साखर संबधित साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्येच ठेवण्यात येत आहे". असे शेट्टी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur heavy Rainfall : सीना, भीमा नदीतील विसर्ग वाढला

Crop Advisory: कृषी सल्ला ( राहुरी विभाग)

Ladakh Protest: थंड लडाखमधील हिंसक झळा

Livestock Flood Management: अतिवृष्टी, महापूर परिस्थितीत पशुधनाचे व्यवस्थापन

Rain Crop Damage : मंगरुळपीर तालुक्यात पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT