Bharat Brand Agrowon
ॲग्रो विशेष

Bharat Brand: दिवाळीच्या तोंडावर 'भारत' ब्रँडचे पीठ, तांदूळ आणि डाळीही महागल्या; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Bharat Brand flour, Rice and Pulses : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात पीठ, तांदूळ आणि डाळी उपलब्ध करून देण्यासाठी 'भारत' ब्रँड केंद्र सरकारने सुरू केला आहे. पण आता याच ब्रँडने पीठ, तांदूळ आणि अनुदानावर विकल्या जाणाऱ्या 'डाळीं'च्या किमती वाढवल्या आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : सध्या राज्यात विधानसभा निवडणूक आणि दिवाळीची जोरदार तयारी केली जात आहे. एकीकडे राजकीय वातावरण गरम झाले असतानाच आता सर्वासामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. 'भारत' ब्रँडचे पीठ, तांदूळ आणि अनुदानावर विकल्या जाणाऱ्या 'डाळीं'च्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सणासुदीच्या काळात लोकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सुरू होणाऱ्या भारत ब्रँड फेज-२ मध्येच दरवाढ करण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) च्या प्रत्यक्ष आणि फिरत्या विक्री केंद्र आणि इतर किरकोळ दुकाने आणि ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म 'भारत' ब्रँडचे पीठ, तांदूळ आणि डाळी विक्रीस उपलब्घ आहेत. मात्र दिवाळीच्या तोंडावर 'भारत' ब्रँडचे पीठ, 'भारत' ब्रँडचा तांदूळ आणि अनुदानावर विकल्या जाणाऱ्या 'भारत डाळी'च्या किमती वाढण्यात आल्या आहेत. हे वाढीव दर आजपासून लागू होण्याची शक्यता आहे.

आता १० किलो भारत पीठ (आटा) ३०० रुपयांना मिळणार असून १० किलो भारत तांदळाचा दर ३४० रुपये आहे. यापूर्वी १० किलो पिठाची किंमत २७५ रुपये होती, तर १० किलो तांदळाची किंमत २९० रुपये होती. एवढेच नाही तर अनुदानावर विकल्या जाणाऱ्या 'भारत डाळी'च्या किमती देखील वाढवण्यात आल्या आहेत. आता भारत ब्रँडची चणाडाळ ६५ रुपयांऐवजी ७० रुपये किलोने मिळणार आहे.

नवभारत टाईम्समधील वृत्तानुसार, सणासुदीच्या काळात लोकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी, भारत ब्रँड फेज-२ सुरू केले आहे. याची अमंलबजावणी बुधवारी (ता. २३) पासून होईल, असे केंद्रीय ग्राहक व्यवहाराशी संबंधित सूत्राने सांगितले आहे. यासोबतच 'भारत पीठ' आणि 'भारत तांदूळ'च्या किरकोळ किंमतीतही बदल करण्यात येत आहेत.

नवीन आदेशानुसार, 'भारत पीठा'ची किरकोळ किंमत ३० रुपये प्रति किलो निश्चित करण्यात आली आहे. जी सध्याच्या दरापेक्षा सुमारे ०.०९ टक्क्यांनी अधिक आहे. 'भारत तांदूळ' ३४ रुपये प्रति किलो करण्यात आला असून यात १७.२४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर भारत ब्रँडची चणाडाळीच्या किंमतीत याआधी २ वेळी वाढ करण्यात आली. याआधी चणाडाळ ६० रूपयांमध्ये उपलब्ध होती. ती नंतर ६५ रुपये प्रति किलो करण्यात आली. तर आता नव्या आदेशाप्रमाणे ७० रुपये प्रति किलो करण्यात आली आहे. याचप्रमाणे १०३ किलोने मिळणारी मूग डाळ आता १०७ रुपये किलो झाली आहे.

भारत ब्रँडमध्ये आता अनेक नव्या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हरभरा आणि मसूर यांचा समावेश आहे. भारत ब्रँड अंतर्गत हरभऱ्याची किंमत ५८ रुपये प्रति किलो तर मसूरची किंमत ८९ रुपये प्रति किलो असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा उठाव वाढला; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत हिरवी मिरचीचे दर?

Agriculture AI : शेती क्षेत्रात ‘एआय’चा वापर लाभदायी

Name Change Of Constituency : राज्यातील पाच विधानसभा अन् तीन लोकसभा मतदारसंघाच्या नावात बदल होणार

Cotton Cultivation : सघन कापूस लागवड फायद्याची

Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड!, जमा केले ऊस बिलापोटी प्रती टन ५० रुपये

SCROLL FOR NEXT