'Bharat' Brand Rice : सरकारचा 'भारत' ब्रँड तांदूळ सर्व सामान्यांच्या आवाक्यात; पाहा किंमत

Aslam Abdul Shanedivan

केंद्र सरकारचा निर्णय

वाढलेल्या महागाईपासून सामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेताना, 'भारत' ब्रँडच्या तांदूळ सामान्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

Bharat Brand Rice | agrowon

२५ रुपयात तांदूळ

केंद्र सरकारने 'भारत' ब्रँडच्या तांदळाला २५ रुपयात विकण्याचा निर्णय घेतला आहे.

Bharat Brand Rice | agrowon

कोण करणार विक्री?

नाफेड आणि एनसीसीएफच्या भांडारांमधून ही विक्री होणार आहे.

Bharat Brand Rice | agrowon

बासमतीचे भाव

बासमती तांदूळ २५ रुपये किलोने सरकार देणार अशी घोषणा असली तरी सध्या बासमतीचे भाव ५० वर पोहोचले आहेत.

Bharat Brand Rice | agrowon

कारवाईचा इशारा

तसेच बाजारपेठेत तांदळाच्या किंमती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात साठवण केली जाते. यावरून व्यापाऱ्यांना कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला होता.

Bharat Brand Rice | agrowon

तांदूळ विक्रीला चालना

तांदूळ विक्रीला चालना देण्यासाठी ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) आणली गेली आहे. यातंर्गत बाजारपेठेतील तांदळाचा साठा वाढविण्यात येणार आहे.

Bharat Brand Rice | agrowon

तांदळाचे क्षेत्र घटले

भारतात ४० टक्क्यांपेक्षा अधिक भात पिकवला जातो. तर यंदा कमी झालेल्या पावसामुळे तांदळाचे क्षेत्र घटले आहे. यंदा धान्य कोठारामध्ये ४७.२ मेट्रीक टन तांदळाचा साठा असून तो साडेतीन पटीने कमी आहे.

Bharat Brand Rice | agrowon

Amla benefit : दररोज आवळा खा निरोगी रहा!