Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management: जल व्यवस्थापनाला केंद्राचा बूस्टर

IoT in Irrigation: केंद्र सरकारने पाणी बचत व उत्पादन वाढीचा दुहेरी उद्देश ठेवत जल व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पथदर्शक प्रकल्प जाहीर केला आहे. ७८ ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत ८० हजार शेतकऱ्यांचा थेट लाभ होणार आहे.

Team Agrowon

Pune News: विविध जलप्रकल्प आणि धरणांतून मोठ्या, लहान आणि कच्च्या कालव्यांद्वारे शेतात पोहोचेपर्यंत होणारा पाण्याचा अपव्यय टाळून पिकांना योग्यवेळी योग्य प्रमाणात पाणी देणाऱ्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सिंचन सुविधांची निर्मिती करणाऱ्या लाभ क्षेत्र विकास आणि जल व्यवस्थापनाच्या पथदर्शक प्रकल्पाला बुधवारी (ता. ९) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली.

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत सोळाशे कोटींच्या उपाययोजनेचा हा पथदर्शक प्रकल्प राज्यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला असून, तो देशभरात एकूण ७८ ठिकाणी राबविण्यात येणार आहे. त्यात कृषी हवामान क्षेत्रातील विविध राज्यांचे ८० हजार शेतकरी सामील होणार आहेत. चालू महिन्यापासूनच ही योजना राबविण्यात येईल, अशी माहिती माहिती व नभोवाणी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

गरज असेल तेव्हाच पाणीपुरवठा

‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, स्काडा, उपग्रह, विविध प्रकारचे सेन्सर आणि उपग्रहांच्या माध्यमातून होणाऱ्या अभ्यासाचा अवलंब करून शास्त्रीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने पिकाला गरज असेल तेव्हाच पाणीपुरवठा, खत पुरवठा करण्याचे तंत्र विकसित केल्यास पिकाचे उत्पादनही वाढेल आणि पाणी वापरही कमी होईल,’’ असे वैष्णव यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ, पिकांची उत्पादकता वाढ, हवामान बदल, जलस्रोत वापर यादृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे मंत्री वैष्णव म्हणाले. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये भागीदारीची भावना निर्माण होऊन परस्पर सहकार्याने काम करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

केंद्रीय धोरणात सध्याची उपयोजना स्थापत्यविषयक कामांना प्राधान्य देत होती. आता त्यात सुधारणा करीत पथदर्शक स्वरूपात लाभक्षेत्र विकासासाठी ही उपयोजना आणली आहे. याशिवाय त्यात बंदिस्त नलिका, सूक्ष्म सिंचन व आयओटी तंत्राला प्राधान्य दिले आहे. भविष्यात हिच पद्धत देशभर स्वीकारली जाण्याची चिन्हे आहेत.
राजेंद्र पवार, माजी सचिव, जलसंपदा विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT