Cashew Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Rate : काजू बियांनाही हमीभाव आवश्‍यक

Cashew Cultivation : जव्हार तालुक्यातील शेतकरीवर्ग पारंपरिक शेतीला जोडधंदा म्हणून, फळबाग लागवड करतो.

Team Agrowon

Cashew Palghar News : जव्हार तालुक्यातील शेतकरीवर्ग पारंपरिक शेतीला जोडधंदा म्हणून, फळबाग लागवड करतो. आता यातून वर्षाकाठी चांगले उत्पन्न मिळत आहे, परंतु काजू खरेदीबाबत सरकारची ठोस उपाययोजना नाही.

परिणामी काजू उत्पादकांना नाईलाजाने काजू बिया शहरातील बाजारपेठेत विक्री कराव्या लागत आहेत. राज्यात काजू बियालाही हमीभाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यात तंत्रज्ञानामुळे आधुनिक शेतीला वेग आला आहे. गेल्या काही वर्षांत काजू लागवड करण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या २० वर्षांत या फळाने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात कमालीची भर घातली आहे.

मात्र शासन पातळीवर काजू बी खरेदीसाठी एक तंत्रशुद्ध नियोजन करून शेतकऱ्यांना प्रेरित केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकणार आहे. यंदा बाजारात प्रतिकिलो ११० ते १३० रुपयांना काजू बी विकले जात आहे. मात्र शेतीसाठी लागणारा खर्च पाहत हे उत्पन्न कमी आहे.

जव्हार, मोखाडा तालुक्यात अनेक सामाजिक संस्था आणि सरकारच्या योजना काजू लागवडीवर काम करत आहेत. परंतु विक्रीसाठी योग्य बाजारपेठ नसल्याने शेतकरी अत्यल्प किमतीत काजू विक्री करतात. राज्यात काजूला हमीभाव मिळणे आवश्‍यक आहे.
दयानंद शेवाळे, काजू उत्पादक
तालुक्यात काजू पिकाचे क्षेत्र ६२५.५२ हेक्टर असून १५४० शेतकरी आहेत. तालुक्यातील लागवडीचे एकूण उत्पादन ६३६ मेट्रिक टन आहे. काजू उत्पादनातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होत आहे. शेतकऱ्यांच्या अन्य समस्या असतील तर त्याकडे लक्ष दिले जाईल.
वसंत नागरे, तालुका कृषी अधिकारी, जव्हार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Home Industry: नाचणी, भाजीपाल्याच्या पापडांची चव न्यारी

Rural Development: ग्रामविकास, बचत गटाला चालना देणारी ‘वनश्री’

Weekly Weather: हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Eknath Shinde: दरडीप्रवण भागातील कुटुंबांचे पुनर्वसन करणार : एकनाथ शिंदे

Sugarcane Workers Welfare: ऊसतोड मजुरांच्या आरोग्य समस्येवर ‘साथी’चा इलाज

SCROLL FOR NEXT