Cashew Nut Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Subsidy : काजू बी अनुदानाकरिता राहिल्यांनीही अर्ज करण्याचे आवाहन

Cashew Farmer Grant : मंत्री श्री. रावल यांच्याकडे काजू उत्पादकांनी काजू पिकाबद्दलच्या विविध समस्या मांडल्या. अनेक विषयावर त्यांनी काजू उत्पादकांशी चर्चा केली.

Team Agrowon

Sindhudurg News : काजू बी अनुदान वितरित करण्याची प्रकिया सुरू झाली असली, तरी ज्या काजू उत्पादकांनी अनुदानाकरिता अर्ज केलेले नाहीत त्यांनी अर्ज करावेत त्यांना देखील अनुदान दिले जाईल, असे आश्‍वासन मंत्री जयकुमार रावल यांनी काजू बागायतदारांना दिले.

मंत्री श्री. रावल यांची सिंधुदुर्ग जिल्हा फळबागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट जिल्हा बँकेचे सभागृहात भेट घेतली. या वेळी जिल्हाध्यक्ष विलास सावंत, संजय देसाई, आकाश नरसुले, राजू पवार, राकेश धर्णे, अशोक सावंत, विलास ठाकूर, शिवराम आसोलकर, नितीन मावळणकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल यांच्याकडे काजू उत्पादकांनी काजू पिकाबद्दलच्या विविध समस्या मांडल्या. अनेक विषयावर त्यांनी काजू उत्पादकांशी चर्चा केली. यावेळी काजू उत्पादकांनी अनेक काजू उत्पादक काजू बी अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत.

काहींनी मुदतीत अर्ज दाखल केले नाहीत त्यामुळे ते वंचित राहिलेले आहेत. या वेळी मंत्री श्री. रावल यांनी ज्या शेतकऱ्यांना अर्ज केलेले नाहीत त्यांनी नव्याने अर्ज करावेत. त्यांना अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली. त्यामुळे वचिंत राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मंत्री जयकुमार रावल यांनी काजू उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. काजू उत्पादकांनी तातडीने आपले अर्ज वेंगुर्ला येथील काजू बोर्डाच्या कार्यालयाकडे जमा करावेत.
- विलास सावंत, अध्यक्ष, फळबागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Pulp Seized: भेसळयुक्त आंब्याचा गर नष्ट

Farmer Protest: आंबा पीक नुकसानभरपाईचा लाभ कोकणाप्रमाणे द्यावा

Konkan Krushi Vidyapeeth: कोकण कृषी विद्यापीठाला ‘ए’ दर्जाचे मानांकन

US Iran Conflict: इराण युद्धाचा शेवट जवळ आला आहे : डोनाल्ड ट्रम्प

Lonar Lake Issue: ‘लोणार’च्या समस्येवर तोडग्यासाठी समिती

SCROLL FOR NEXT