Cashew Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Pest Infestation: किडीच्या प्रादुर्भावाने काजू बागायतदार हैराण

Cashew Crop Loss: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू पिकांमध्ये बी आणि बोंड खाणाऱ्या अळीमुळे काजू बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. काजू बीच्या संपूर्ण घोसाचे ही कीड नुकसान करीत असल्याने त्याचा मोठा परिणाम काजू उत्पादनावर होणार आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू पिकांमध्ये बी आणि बोंड खाणाऱ्या अळीमुळे काजू बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. काजू बीच्या संपूर्ण घोसाचे ही कीड नुकसान करीत असल्याने त्याचा मोठा परिणाम काजू उत्पादनावर होणार आहे.

जिल्ह्यात या वर्षी काजू हंगाम काहीसा विलंबाने सुरू झाला आहे. अजूनही काजूचे अपेक्षित उत्पादन सुरू झालेले नाही. मात्र वाढलेले तापमान, सतत पडणारे धुके यामुळे काजूचा मोहोर करपल्याने काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाशी सामना करीत असतानाच या वर्षी काजू उत्पादकांसमोर फळखाणाऱ्या किडीने मोठे आव्हाने उभे केले आहे. जिल्ह्यातील काजू बागांमध्ये कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात ही कीड आढळून आलेली नव्हती.

प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात ही कीड बागांमध्ये नुकसान करताना दिसून येत आहे. अनेक काजू उत्पादकांनी या किडीच्या प्रतिबंधाकरिता विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी केली, परंतु त्याचा तितकासा उपयोग होताना दिसत नाही.

काजू बीच्या संपूर्ण घोसाचे ही कीड नुकसान करीत असल्याने काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कच्ची बी आणि बोंड दोघांचेही किडीमुळे नुकसान होत आहे. वेंगुर्ला चार या जातीमध्ये या किडीचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. याचा मोठा परिणाम काजू उत्पादनावर होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या वर्षी बी आणि बोंड खाणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या किडीच्या प्रतिबंधाकरिता विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी देखील घेतली, परंतु तरीदेखील कीड नियत्रंणात आलेली नाही.
आकाश नरसुले, काजू उत्पादक, कुडासे, ता. दोडामार्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Market: हळदीचे वायदे बंद करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

Maharashtra Rain: राज्यात २३० मंडलांत अतिवृष्टी

Vidarbha Crop Loss: विदर्भात दोन लाख हेक्टरवर पीक नुकसान

Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT