Cashew Board Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Board Kolhapur : काजू मंडळाचे विभागीय कार्यालय चंदगडला, शेतकरी, शेतमजुरांना होणार लाभ

sandeep Shirguppe

Cashew Board Divisional Office : राज्याच्या कृषी, पणन विभागाने काजू पट्टा असलेल्या चंदगड येथे काजू मंडळाचे विभागीय कार्यालयासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्याचा लाभ कोल्हापूर आणि कोकणाला होणार आहे. तसेच जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज परिसरातील हजारो शेतकरी व शेतमजुरांना याचा लाभ मिळणार आहे. १२ ते १३ हजार हेक्टर क्षेत्र या कार्यालयाच्या अखत्यारित येणार आहे. तसेच या भागात २०० काजू प्रक्रिया उद्योग आहेत याची जवळपास ३५० ते ५०० कोटींपर्यंत होत असते ५ हजार लोकांना काजू प्रक्रिया उद्योगातून रोजगार मिळत असतो. या सगळ्याचा विचार करून चंदगडला काजूचे विभागीय कार्यालय मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. काजू मंडळांकडून काजू फळाचे प्रमोशन, प्रक्रिया, गुणवत्ता वाढ व मार्केटिंगचे कामकाज होणार आहे. विभागीय कार्यालय चंदगडला, मुख्यालय, नवी मुंबई वाशी येथे होणार होते. त्याऐवजी ते वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भूदरगड, राधानगरी तालुक्यात काजू उत्पादन सर्वाधिक आहे. त्यानुसार चंदगड तालुक्यात गेली अनेक वर्षे काजू प्रक्रिया उद्योग चालविण्यात येतात. त्याला शासनस्तरावर मान्यता असली तरी अनुदानापासून, प्रक्रिया व मार्केटिंग, आदींबाबत मार्गदर्शन अथवा अनुदान मिळत नव्हते. तसेच या संदर्भातील काही माहिती लागलीच तर त्यासाठी मुंबईला काजू मंडळाच्या मुख्यालयाशी संपर्क करण्यासाठी वेळ व पैसे जास्त खर्च होणार होते.

त्यात चंदगड येथे व रत्नागिरी येथे विभागीय कार्यालय व्हावे अशी मागणी होती. त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही जोर लावला होता. शासनस्तरावर विविध पातळ्यांवर अंदाज घेऊन अखेर चंदगड येथे विभागीय कार्यालयावर अंतिम शिक्कामोर्तब झाले.

कोल्हापूर जिल्ह्यात काजूचे विभागीय कार्यालय व्हावे यासाठी राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी पाठपुरावा केला होता. याबाबत आमदार आबिटकर म्हणाले की, चंदगडला काजूचे विभागीय कार्यालय झाल्याने शेतकऱ्यांना काजू लागवड, प्रक्रिया, पॅकेजिंग, आयात-निर्यातसाठी अनुदान मिळविणे शक्य होणार आहे. काजू उद्योग वाढीसाठी स्थानिक स्तरावर मार्गदर्शन शिबिर व प्रात्यक्षिके घेण्यास सोपे जाणार आहे.

लागवड, प्रक्रिया, मार्केटिंग, परदेशी बाजारपेठसह जीआय मानांकनही शक्य होणार आहे. तसेच यामध्ये राधानगरी, गडहिंग्लज, भुदरगड या तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याने या तालुक्यातही काजू लागवडीचे क्षेत्र वाढवण्यास मदत होणार आहे.

राजर्षी शाहू महाराज काजू उद्योग विकास संस्थेचे अध्यक्ष मोहन परब म्हणाले की, काजू मंडळाचे विभागीय कार्यालय चंदगडला करण्यास मान्यता मिळाल्याने स्थानिक काजू उत्पादन व प्रक्रिया उद्योगाला उभारी मिळेल. येत्या अधिवेशनात त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद होणे, कार्यालय उभारणीसाठी पायाभूत सुविधा, कार्यालय तातडीने कार्यान्वित करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. त्याचा लाभ येणाऱ्या हंगामापासूनच येथील काजू उद्योजकांना होऊ शकेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

Indian Agriculture : शिळ्या कढीला ऊत

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

SCROLL FOR NEXT