Shivganga River  Agrowon
ॲग्रो विशेष

Shivganga River : ढापे न काढल्याने बंधारा तुडुंब

Water Storage : उन्हाळ्यात हा बंधारा पूर्णपणे कोरडा पडतो या बंधाऱ्याकडे पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

Team Agrowon

Pune News : नसरापूर येथील शिवगंगा नदीच्या बंधाऱ्यावरील ढापे न काढल्यामुळे अवकाळी पावसामध्येच बंधारा तुडुंब झाला असून या दरम्यान नदीला मोठा पूर आल्यास बंधारा फुटण्याचा धोका निर्माण झाला असून येथील ढापे तातडीने काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नसरापूर येथे शिवगंगा नदीवर गेले वीस वर्षापूर्वी सिमेंट बंधारा बांधला असून या बंधाऱ्यामुळे नसरापूर माळेगाव परिसरातील शेतकऱ्यांना जानेवारी फेब्रुवारी पर्यंत पाणी उपलब्ध होऊन शेतीसाठी वापरता येते तसेच या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे नसरापूर बनेश्वर मंदिराच्या परिसराची शोभा देखिल वाढते मात्र गेल्या काही वर्षांपासून हा बंधारा गळती होत असून पाणी टिकून राहत नाही उन्हाळ्यात हा बंधारा पूर्णपणे कोरडा पडतो या बंधाऱ्याकडे पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

बंधाऱ्याचे ढापे न काढल्याने बंधाऱ्यामध्ये ढापे घट्ट बसले असून पाटबंधारे कर्मचाऱ्यांना हे ढापे निघत नसल्याने ढापे तसेच ठेवल्याचे निदर्शनास आले आहे दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात देखिल हे ढापे काही प्रमाणात तसेच ठेवले गेल्याने ढाप्यांच्या वरून पाणी वाहून गेले होते व मोठ्या प्रमाणात पूर आल्यानंतर बंधाऱ्याच्या एका बाजूने मातीचा ढिगारा पडून पाणी वाहून गेले होते त्यामुळे बंधाऱ्याच्या शेजारीच मोठा बोगदा पडला होता. त्याची दुरुस्ती झाली आहे परंतु आता देखिल बंधाऱ्याचे ढापे तसेच असल्याने यावर्षी देखिल बंधाऱ्यास धोका पोहचू शकतो.

पावसाळा सुरू होण्याअगोदर शिवापूर परिसरात ढगफुटी सर्दुश्य पाऊस पडल्याने शिवगंगा नदीस तीन दिवसांपूर्वी अचानक मोठा पूर आला या पुराच्या पाण्यात ढापे काढलेले नसल्याने हा बंधारा तुडुंब भरला आहे व ढाप्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे येथून पुढे पावसामुळे मोठे पूर येण्याची शक्यता असल्याने हे ढापे तातडीने काढणे गरजेचे असल्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आर. व्ही. ढमाळ यांच्या याबाबत संपर्क साधला असता पावसाळ्याच्या अगोदर ढापे काढण्याचे काम सुरू असून आमच्या विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या गुंजवणी नदीवरील सर्व बंधारे व शिवगंगा नदीवरील एकमात्र नसरापूर येथील बंधाऱ्याचे ढापे काढले जात आहेत. नसरापूर बंधाऱ्याचे ढापे दोन दिवसात काढले जातील अशी माहिती त्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT